महापुरुषांचे विचार आचरणात आणावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:36 AM2021-04-16T04:36:52+5:302021-04-16T04:36:52+5:30

प्रदीप सोळुंके बोलताना पुढे म्हणाले की महापुरुषांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी. आणि त्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात ...

The thoughts of great men should be put into practice | महापुरुषांचे विचार आचरणात आणावे

महापुरुषांचे विचार आचरणात आणावे

googlenewsNext

प्रदीप सोळुंके बोलताना पुढे म्हणाले की महापुरुषांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी. आणि त्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्यावे. कारण प्रत्येक व्यक्तीने उदारमतवादी व परिवर्तनवादी विचार आत्मसात करायची शृंखला स्वतःपासून सुरू करावी, ज्यातून संपूर्ण समाज परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करील. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांचे वैचारिक वारसदार असल्याचे मतदेखील त्यांनी प्रसंगी व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी महाराष्ट्र हा पुरोगामित्वाचे दर्शन घडविणारा प्रांत असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली संवैधानिक समता ही सर्व जनसामान्यांच्या उन्नतीचे प्रमुख साधन असल्याचे देखील त्यांनी प्रसंगी प्रतिपादित केले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत कढरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ. हसीन तडवी, डॉ. दीपक नगराळे, देवरे यांनी प्रयत्न केले.

Web Title: The thoughts of great men should be put into practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.