शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

९५ दिवसांनंतरही बळसाण्याचे तेरावे तीर्थकरांचे मंदिर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 13:21 IST

लॉकडाऊनचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कबळसाणे : बळसाणे हे जैन धर्मियाचे तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या विमलनाथ भगवंताचे दोघी मंदिर गेल्या तीन ते साडेतीन महिन्यापासून बंद आहे़ परिणामी भाविकांना दर्शनाची आस लागली आहे.मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात देशात संचारबंदी लागू झाली़ त्यामुळे मंदिरातील धार्मिक कार्यक्रमात भाविकांची गर्दी जमा होवू नये असे प्रशासनाचे आदेश सर्वत्र निघाल्याने येथील तीर्थक्षेत्राच्या संचालकांनी दोघी मंदिरांचे द्वार बंद करण्याचा निर्णय घेत प्रशासनास सहकार्य केले़ मात्र, दर महिन्याच्या पौर्णिमेला भाविकांची व शनिवार, रविवारी त्याचप्रमाणे उन्हाळी सुट्टीत परराज्यातील भाविकांची अलोट गर्दी बळसाणे तीर्थक्षेत्रावर जमते़ परंतु कोरोना महामारीमुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांची हिरमोड होत आहे़ महिन्याच्या पौर्णिमेला नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थित राहते़ पण, मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून भाविक विमलनाथ दादांच्या दर्शनापासून आलिप्त आहेत़ मंदिराची दारे कधी उघडेल हीच अपेक्षा आता तरी भाविकांना लागली आहे़ गावातील काही भक्त विमलनाथ दादांच्या जिन्याच्या शेवटच्या पायरीवर डोके टेकून दर्शन घेत आहेत़लॉकडाऊन घोषित झाल्यापासून शितलनाथ संस्थान संचलित विमलनाथ भगवंताचे व विश्वकल्याणातील विमलनाथ भगवंताचे मंदिरे पुजाऱ्याच्या हस्ते विधीवत पुजा आरती करुन दिवसभरासाठी मंदिर बंद राहते़ तसेच सायंकाळची आरती आटोपल्यावर मंदिरे बंद होत असल्याचे विश्वकल्याणाकाचे ट्रस्टी महावीर जैन यांनी सांगितले़ मंदिर परिसरातील भाविकांनी अक्षरश: व्यवसायात थोडा बदल केल्याचे चित्र दिसून येत आहे़ तसेच फुलांची, नारळ, पुजापत्रीची धार्मिक दुकानांची रेलचेल मंदावली आहे़२२ मार्च पासून मंदिरे बंदकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील व विश्वकल्याणक येथील मंदिराचे दरवाजे बंद झाले आणि मंदिर परिसरात गर्दी होवू नये म्हणून २२ मार्च २०२० पासून प्रशासनाच्या आदेशानुसार बळसाणे तीर्थक्षेत्रावरील दोघी मंदिरे बंद करण्यात आली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे