शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

शिरपूर नगरपालिकेला सलग तिसºयांदा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 5:43 PM

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान : नागरिकांना मिळताय विविध सुविधा

ठळक मुद्देशिरपूर नगरपालिका पुरस्कार जाहीरनगराध्यक्षांनी स्विकारला पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : सलग तीनदा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा प्रथम पुरस्कार पटकावणाºया शिरपूर पालिकेला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा वसुंधरा- २०१८ पुरस्कार जाहीर झाला़ मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शिरपुरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी स्विकारला़ पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन या चार निकषांवर हा पुरस्कार देण्यात आला आहे. २४ तास पाणीपुरवठा योजना विक्रमी वेळेत यशस्वीरीत्या कार्यरत करणारी संस्था म्हणून शिरपूर पालिकेची ख्याती आहे. दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठा, या यंत्रणेवर देखरेख करणारी अत्याधुनिक स्कॅडा सिस्टम, इन्फ्रारेड तंत्रज्ञान वापरून बिले देण्याची सुविधा, अचूक रिडींग देणारे मिटर्स ही पाणीपुरवठा यंत्रणेची वैशिष्ट्य आहेत. संपूर्ण शहरात भूमिगत गटार योजना राबवली असून त्यामुळे डास निर्मूलनात मोलाचे योगदान लाभले आहे. अरुणावती नदीकाठावर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे. घनकचरा व्यवस्थापनात पालिका अव्वल आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्ररित्या गोळा करण्याची सुविधा असलेली वाहने, घराघरात वाटप केलेले डस्टबीन्स, अद्ययावत कचरा डेपो, कॉलनी परिसरात विकसित जैविक खत प्रकल्प यामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना साकारली आहे.पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण यासाठी पालिका प्रारंभापासून आग्रही व उपक्रमशील आहे. शहरातील मोकळ्या जागा, उद्याने, सार्वजनिक जागा, नाला व नदीकाठ, रस्त्यांच्या कडेच्या जागा येथे विविध प्रजातीचे लाखो वृक्ष आहेत. त्यात कडुनिंबाच्या झाडे सर्वाधिक आहेत. याशिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये शहराचा पुढाकार असून तब्बल ४१ प्रकल्प कार्यान्वित आहेत. शिरपूर पॅटर्नला लोकमान्यता मिळाली असतांना आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पालिकेला वसुंधरा पुरस्कार जाहीर झाल्याने शहरविकासाला राजमान्यताही लाभल्याचे मानले जात आहे. आमदार अमरिशभाई पटेल यांनी १९८५ पासून केलेल्या नियोजनपूर्वक कायार्मुळे पालिका राज्यात अग्रस्थानी आहे. पालिकेत वेळोवेळी पद भूषविणारे नगराध्यक्ष, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या कामांची पावती म्हणजे हा पुरस्कार आहे. यापुढेही शहराची घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न होतील, असे नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :DhuleधुळेShirpurशिरपूर