धुळे : येथील बायपास हायवेलगत असलेल्या एसआरपीएफच्या वसाहतीमध्ये धनश्री कैलास ठाकुर यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि आठ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख २४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला़ घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी घर फोडले़ ११ जून ते २ जुलै दरम्यान ही चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले़ याप्रकरणी धनश्री ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन धुळे तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
एसआरपीएफ वसाहतीत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 22:48 IST