लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील रतनपुरा येथे झालेली चोरी धुळे तालुका पोलिसांनी उघडकीस आणली आहे़ याप्रकरणी एका चोरट्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीला गेले १३ तोळे सोने हस्तगत करण्यात आले़ धुळे तालुक्यातील रतनपुरा येथे चोरी करणाºया चोरट्याला तालुका पोलिसांच्या पथकाने बुधवारी सकाळी ताब्यात घेतले़ त्याच्याकडून १३ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत़ प्रशांत जगन्नाथ भदाणे (४३) यांच्या धुळे तालुक्यातील रतनपुरा येथील घरातून जुबेर रहिम मनीयार (२२, रा़ रतनपुरा ता़ धुळे हल्ली मुक्काम ग्रिन कॉलनी, धुळे) याने जानेवारी २०१८ ते २१ आॅगस्ट २०१८ या काळात १३ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते़ चोरीला गेलेल्या ऐवजची रक्कम ३ लाख २५ हजार रुपये होती़ २५ आॅगस्ट रोजी भदाणे यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती़ त्यानंतर पोलीस निरीक्षक डी़ व्ही़ वसावे यांनी तपासाची चक्रे फिरविली होती़ तपासासंदर्भात वेगवेगळे पर्याय अंगिकारण्यात आले होते़ संशयिताच्या मागावर तालुका पोलिसांचे पथक होते़ गोपनीय तपास सुरु असताना संशयिताचे लोकेशन कळताच त्याला बुधवारी सकाळी त्याच्याच घरातून ताब्यात घेण्यात आले़ त्याला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने चोरलेले सोने पोलिसांना काढून दिले़ चोरीचा हा मुद्देमाल धुळे तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे़ उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, पोलीस उपनिरीक्षक विनोद वसावे, हेड कॉन्स्टेबल प्रकाश मोहने, प्रल्हाद चव्हाण, पोलीस कर्मचारी प्रमोद ईशी, विश्वेश हजारे, सतिश कोठावदे यांनी ही कामगिरी केली़
रतनपुराची चोरी उघड, मुद्देमालासह चोरटा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 21:58 IST
१३ तोळे सोने जप्त : धुळे तालुका पोलीस
रतनपुराची चोरी उघड, मुद्देमालासह चोरटा गजाआड
ठळक मुद्देरतनपुरा येथे झालेली चोरी उघडधुळे तालुका पोलिसांची कामगिरी