लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासकीय भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले १० रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांना टाळ्यांच्या गजरात घरी पाठविण्यात आले.गुरूवारी दहा रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील सात तर जिल्हा रूग्णालयातील तीन रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये धुळे शहरातील सात व शिरपूर येथील तीन रूग्णाचा समावेश आहे. धुळे शहरातील कृषी नगरातील दोन रूग्ण कोरोनामुक्त झाले.गल्ली क्रमांक सहा, राजेंद्रसुर्य नगर, व स्वामीनारायण कॉलनी येथील प्रत्येकी एका रूग्णाने तसेच एसआरपीएफच्या एका जवानाने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १६६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोना बाधीतांचा आकडा ज्या गतीने वाढतो आहे. त्याच गतीने पॉझिटिव्ह रुग्ण बरे देखील होत आहे. ही धुळेकरांसाठी दिलासादायक बाब आहे.
दहा रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:44 IST