शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील २४ न्यायाधीन बंदिवानांना तात्पुरता जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 21:54 IST

जिल्हा कारागृह : न्यायालयाच्या आदेशानंतर अंमलबजावणी

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील कारागृहात सुरक्षिततेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे़ पहिल्यांदाच सॅनिटायझर आणि मास्कचा वापर होत आहे़ याशिवाय ७ वर्षापर्यंत शिक्षा लागू शकते अशा २४ न्यायाधीन बंदिवानाना न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, अशी माहिती धुळे जिल्हा कारागृहातील सुत्रांनी दिली़ जिल्हा कारागृहात सध्या १५ नवे बंदिवान दाखल झालेले आहेत़ त्यांना १४ दिवस क्वॉरंटाईन करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे़कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशपातळीवरुन दखल घेण्यात आलेली आहे़ त्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले असून गर्दी टाळा, घरी बसा असे वेळोवेळी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे़ याची दखल कारागृहातील बंदिवानांसाठी देखील घेण्यात आलेली आहे़ न्यायालयस्तरावर विचार विनिमय होऊन दखल घेण्यात आली़ त्यात ७ वर्षापर्यंत अथवा त्या खालोखाल शिक्षेस पात्र ठरु शकतात अशा बंदिवानांसाठी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर करण्याचे आदेश पारीत केले़ त्यानुसार सद्याच्या स्थितीत २४ न्यायाधीन बंदी आहेत़ त्यांची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली़ सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहनाची व्यवस्था नाही की संबंधित बंदीवानांचे कोणी नातेवाईक येऊ शकत नाही ही बाब लक्षात घेऊन दोन वाहनाच्या माध्यमातून त्या २४ पुरुष न्यायाधीन बंदिवानांना त्यांच्या घरापर्यंत सोडून देण्यात आले आहे़ त्यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्यांकडून बंदिवानाना ताब्यात देण्यासंदर्भात आणि शासनाचे आणि कायद्याचे पालन करण्याबाबत लिहून घेण्यात आलेले आहे़ हा तात्पुरता जामीन सुरुवातीला ४५ दिवसांसाठी असणार आहे़ त्यानंतर आवश्यकता भासेल तसे ३० दिवसांप्रमाणे जामीनाची मुदत वाढविण्यात येणार आहे़ कोरोनाच्या अनुषंगाने धुळ्यातील कारागृहात आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्यात येत आहे़ २४ जणांना तात्पुरता जामीन मंजूर केल्यानंतर उर्वरीत २७० न्यायाधीन बंदिवान शिल्लक आहेत़ त्यात २५० पुरुष आणि २० महिलांचा समावेश आहे़ यांच्यासह कारागृहातील सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आलेले आहे़ न्यायालयात गर्दी होऊ नये यासाठी कारागृहातूनच सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज होत आहे़ त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी कोणत्याही बंदिवान्याला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही़न्यायाधीन बंदिवानाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कारागृह अधीक्षक डी़ जी़ गावडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी दिपा आगे, मंडळ तुरुंगाधिकारी एऩ एम़ कन्नेडवाल, महिला तुरुंगाधिकारी नेहा गुजराथी, वैद्यकीय अधिकारी शिवाजी जायभाये, शिक्षक हेमंत पोतदार आणि अन्य पोलीस महिला व पुरुष कर्मचारी लक्ष ठेवून असतात़

टॅग्स :Dhuleधुळे