शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

३६ न्यायाधीन बंदिवानांना तात्पुरता जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:03 IST

जिल्हा कारागृह : न्यायालयाच्या आदेशानंतर अंमलबजावणी

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील कारागृहात सुरक्षिततेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे़ पहिल्यांदाच सॅनिटायझर आणि मास्कचा वापर होत आहे़ याशिवाय आतापर्यंत ७ वर्षापर्यंत शिक्षा लागू शकते अशा ३६ न्यायाधीन बंदिवानाना न्यायालयाच्या आदेशाने तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, अशी माहिती धुळे जिल्हा कारागृह अधीक्षक डी.जी.गावडे यांनी दिली.कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशपातळीवरुन दखल घेण्यात आलेली आहे़ त्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले असून गर्दी टाळा, घरी बसा असे वेळोवेळी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे़ याची दखल कारागृहातील बंदिवानांसाठी देखील घेण्यात आलेली आहे़ न्यायालयस्तरावर विचार विनिमय होऊन दखल घेण्यात आली़ त्यात ७ वर्षापर्यंत अथवा त्या खालोखाल शिक्षेस पात्र ठरु शकतात अशा बंदिवानांसाठी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर करण्याचे आदेश पारीत केले़ त्यानुसार एप्रिल महिन्यात २४ न्यायाधीन बंदीवानांना जामीनवर सोडण्यात आले. सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहनाची व्यवस्था नाही की संबंधित बंदीवानांचे कोणी नातेवाईक येऊ शकत नाही ही बाब लक्षात घेऊन दोन वाहनाच्या माध्यमातून त्या २४ पुरुष न्यायाधीन बंदिवानांना त्यांच्या घरापर्यंत सोडून देण्यात आले होते.त्यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्यांकडून बंदिवानाना ताब्यात देण्यासंदर्भात आणि शासनाचे आणि कायद्याचे पालन करण्याबाबत लिहून घेण्यात आलेले आहे़त्यानंतर मे महिन्यात आणखी १२ बंदिवानांना तात्पुरता जामीनावर सोडून देण्यात आले आहे.हा तात्पुरता जामीन सुरुवातीला ४५ दिवसांसाठी असणार आहे़ त्यानंतर आवश्यकता भासेल तसे ३० दिवसांप्रमाणे जामीनाची मुदत वाढविण्यात येणार आहे़ कोरोनाच्या अनुषंगाने धुळ्यातील कारागृहात आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्यात येत आहे़ यांच्यासह कारागृहातील सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आलेले आहे़ न्यायालयात गर्दी होऊ नये यासाठी कारागृहातूनच सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज होत आहे़ त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी कोणत्याही बंदिवान्याला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही़न्यायाधीन बंदिवानाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कारागृह अधीक्षक डी़ जी़ गावडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी दिपा आगे, मंडळ तुरुंगाधिकारी एऩ एम़ कन्नेडवाल, महिला तुरुंगाधिकारी नेहा गुजराथी, वैद्यकीय अधिकारी शिवाजी जायभाये, शिक्षक हेमंत पोतदार आणि अन्य पोलीस महिला व पुरुष कर्मचारी लक्ष ठेवून असतात़

टॅग्स :Dhuleधुळे