धुळे : कोरोना पार्श्वभुमीवर शासनाने शाळांना सुटी जाहीर केली होती़ त्यानंतर १५ जूनला शाळा सुरू होतील असा अंदाज व्यक्त केला जात होतो़ सोमवारचा ही मुर्हूत हुकल्याने दरवर्षी सुरू होणारा विद्यार्थ्यांचा किलबिलाट कानी न आल्याने शाळेच्या परिसरात शुकशुकाट दिसुन आला़कोरोनाचा विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी तीन महिन्यापासून शाळा बंद आहेत़ १५ जूनपर्यंत परिस्थित नियंत्रणात येवून शाळा सुरू होतील, असा अंदाज लावण्यात येत होता. पण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४१० पर्यत पोहचली आहे़ त्यामुळे शहरातील सुमारे ८७ भागात कंन्टेमेंट झोन तयार करण्यात आले़ त्यामुळे अशा परिस्थितीत कंन्टेमेंट झोन मधील रिक्षा चालक, विद्यार्थी, पालक किंवा विद्यार्थी शाळेत शिक्षण घेण्यासाठी आले तर त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बहूसंख्य पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाही, असे पालकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेतून दिसते.शासनाकडून आदेश नाही़जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून अद्याप निर्देश दिलेले नाहीत़ त्यामुळे १५ जूनला शाळा सुरू होण्याचा मुर्हूत यंदा पहिल्यांदा हूकला आहे़ त्यामुळे यंदा शाळा कधी सुरू होतील याबाबत पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम निर्माण झाले आहे़ दरम्यान, शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू होणार असल्याने समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तके दाखल झाली आहेत़आॅनलाईन शिक्षणाची तयारीअडीच महिन्यानंतर अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये़ यासाठी आता विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण देण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे़ काही ठिकाणी तर खाजगी शाळा प्राथमिक ते माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याना आॅनलाईन शिक्षण घरीच देत आहे़प्रारंभिक तयारी पूर्णदुसरीकडे शहरात महापालिकेच्या मराठी व उर्दु माध्यमाच्या २० शाळा आहेत़ पावसाळामुळे शाळांची दुरूस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाळाचा दरवाजा,खिडक्याची दुरूस्ती तसेच पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जागृत करणे, व्हॉटसअप गृ्रपद्वारे शाळा सुरू शाळांची माहिती पोहचविणेचे आदेश मनपा शिक्षण मंडळाकडून शिक्षकांना देण्यात आली आहे़ त्यानुसार शिक्षकांकडून पूर्वतयारी केली जात आहे़१६५ शाळांना पुस्तके वाटपमहानगरात १६५ शाळेतील सुमारे ५० हजार २५३ विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके वाटप केली जात आहे़ त्यात इयत्ता पहिली ते आठवीसाठी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ५० हजार ६७ पुस्तक संचाची मागणी मनपा शिक्षण मंडळाकडे करण्यात आली होती़ यामध्य मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या पुस्तकांचा समावेश आहे. शासनाकडून प्राप्त झालेले पुस्तके शहरातील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेचे पुस्तके मोफत देण्यात येत आहे़सोशल डिस्टन्स ठेवून वाटपशासनाकडून शाळा सुरू करण्याचा निर्णय केव्हाही घेतला जावू शकतो़ त्यावेळी वाटप गोधळ होऊ नये़ यासाठी मनपा शिक्षण मंडळाकडून शाळांना बोलावून पुस्तकांचे वाटप केले जात आहे़ वाटपावेळी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये, यासाठी मास्क, सॅनेटराझर तसेच सोशल डिस्टन्स ठेवून पुस्तकांचे वाटप केले जात आहे़ आतापर्यत १९ शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे़गरजू विद्यार्थ्यांना दिलासाविद्यार्थी संख्येनुसार या पुस्तकांची मागणी होत असते. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येत असतात.याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असतो. यापूर्वी सर्व शिक्षा अभियानांतर्गत ही पुस्तके दिली जात होती. मात्र आता पहिली ते बारावीपर्यंतचा समावेश समग्र शिक्षा अभियानात करण्यात आलेला असून, त्यांच्यामार्फतच विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप होणार आहे़ शहरातील पहिली ते आठवी पर्यतच्या सुमारे ५० हजार ६७ विद्यार्थ्यांची पुस्तकांची मागणी आहे़पुस्तक परत करण्याचे प्रमाण कमीदरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येतात. वर्षभर पुस्तकांचा वापर केल्यानंतर निकालाच्या दिवशी शाळेत परत करणे आवश्यक असतात. मात्र अनेक विद्यार्थी-विद्यार्थी पुस्तके परत करीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यातील जे पुस्तके चांगले असतात त्यांची माहिती शासनाकडे पाठविली जाते़ तर जुने व नव्या पुस्तकांची मागणी नुसार विद्यार्थ्यांना दरवर्षी पुस्तकांचे वाटप केले जाते़
शाळा सुरू करण्याबाबत शिक्षक संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:09 IST