चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सुसज्ज इमारत, पिण्यासाठी शुध्द पाणी, खेळण्यासाठी पुरेशी जागा, सकस ताजा आहार, दर्जेदार शिक्षणासह मुलांना घरापासून ते शाळेपर्यत पोहचविण्यासाठी स्वतंत्र रिक्षाची व्यवस्था ही सुविधा खाजगी शाळेची नसून मनपा उर्दू शाळा क्रं.५३ मध्ये दिली जाते़ मुलांना सोयी-सुविधा देण्यासाठी शासन निधीवर अवलंबून न ्नराहता, मनपा उर्दू शाळेतील शिक्षक चक्क आपल्या पगारातून विद्यार्थ्यांचा प्रवासाचा खर्च उचलतात.मालेगावरोडवरील बोरसे नगर येथे मनपा उर्दू शाळा क्रं ५३च्या परिसरात खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत़ तरीही या शाळेत १७० विद्यार्थी, १३५ विद्यार्थींनी असे एकून ३०५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळा शुभारंभ, गणवेश वाटप, योग दिन, वृक्षारोपण स्वच्छता रॅली, हातधुवा दिन आदी उपक्रम राबविले जातात. त्याचबरोबर इंग्रजी, मराठी, उर्दू भाषा तसेच डिजीटल शिक्षण दिले जाते़ त्यामुळे खाजगी इंग्रजी शाळेच्या तुलनेत मनपा शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सहा रिक्षा भाड्याने लावण्यात आल्या आहेत़ त्यासाठी दर महिन्याला लागणारा सुमारे ३० ते ३५ हजार रूपयांचा खर्च येथील शिक्षक आपल्या वेतनातून करीत असतात. शहरात महापालिकेच्या १० उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत़ त्यापैकी लोकसहभागातून विद्यार्थ्यांना बहूसंख्य सुविधा पुरविणारी एकमेव उर्दू शाळा आहेत़तरीही मनपाकडून शाळेत पाण्याची व्यवस्था पुरविली जात नसल्याने दररोज शिक्षकांना ५ ते ६ पाण्याचे जार विकता घ्यावे लागतात़ महानगरपालिकेने शाळेत मुलभूत सुविधा व शाळेत शिक्षकांची संख्या वाढवावी अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केलेली आहे.मनपा: शाळेच्या आवारात सीसीटीव्ही, वायफाय सुविधा देणारी एकमेव उर्दू शाळा