लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दोंडाईचा येथील नुतन माध्यमिक विद्यालयात एका बालिकेवर झालेल्या अत्याचारानंतर जळगावसह दोंडाईचा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला़ तपासाला गती मिळत असून महेंद्र आधार पाटील या शिक्षकाला अटक करण्यात आली़ परिणामी तपासाला गती मिळण्यास सुरुवात झाली आहे़ दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाºया एका पाच वर्षीय बालिकेला गेल्या ८ फेब्रुवारी रोजी मधल्या सुटीत चॉकलेटचे आमिष दाखवून नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केला होता़ या घटनेने शाळेची बदनामी होईल, तुम्ही तक्रार करु नका़ आम्ही तुम्हाला वैद्यकीय खर्च देवू असे म्हमत मुलीच्या पालकाला धमकाविले होते़ परिणामी घाबरल्यामुळे लागलीच पोलिसात तक्रार करण्यात आलेली नव्हती़ असे असलेतरी पीडित बालिकेच्या आईने जळगावसह दोंडाईचा पोलिसात तक्रार दाखल केली़ माजी मंत्री डॉ़ हेमंत देशमुख यांच्यासह ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे़ त्या आधारे पोलिसांनी शिक्षक महेंद्र आधार पाटील याला संशयावरुन अटक केली़ घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत़
शिक्षक महेंद्र पाटील याला शिताफिने अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 16:07 IST
बालिका अत्याचार प्रकरण : दोंडाईचा पोलिसांकडून तपासाला गती
शिक्षक महेंद्र पाटील याला शिताफिने अटक
ठळक मुद्देदोंडाईचा येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणजळगावसह दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखलसंशयित शिक्षकाला अटक, तपासाला गती