कासारे : साक्री तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात म्हसदी येथील सी.डी. देवरे विद्यालयाचा संदीप नवल सोनवणे याने प्रथम तर पिंपळनेर येथील कर्म.आ.मा. पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी कल्याण रत्नाकर चव्हाण हिने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. त्यांची जिल्हास्तरीय मेळाव्यासाठी निवड करण्यात आली आहे.साक्री तालुक्यातील इयत्ता आठवी ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य विज्ञान संस्था नागपूर व शिक्षण विभाग पंचायत समिती, साक्री, मुख्याध्यापक संघ, साक्री तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने कासारे येथील वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयात ३० जुलै रोजी तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.व्ही. पवार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.जे. पाटील, मंडळाचे सल्लागार के.डी. सोनवणे, सुहास सोनवणे, एस.डी. खैरनार, कासारे अंनिसचे अध्यक्ष सुरेश पारख, मुख्याध्यापक एस.के. अहिरराव, पी.एम. कदम, एस.आर. खैरनार, प्रविण भामरे आदी उपस्थित होते. मेळाव्यात १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात म्हसदी येथील सी.डी. देवरे विद्यालयाचा विद्यार्थी संदीप नवल सोनवणे याने प्रथम, पिंपळनेर येथील कर्म.आ.मा. पाटील विद्यालयाच्या कल्याण रत्नाकर चव्हाण हिने द्वितीय तर कासारेच्या मेहता विद्यालयाची मुस्कान असिफ पटवे व दिघावेच्या रितीका महेंद्र दशपुते यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. विजेत्यांना स्व.सतिष मोतीलाल जैन यांचे स्मरणार्थ साक्री येथील किराणा व्यापारी सुनील जैन यांनी स्मृतीचिन्ह दिले. परीक्षक म्हणून प्रा.डॉ.सचिन नांद्रे व एस.डी. खैरनार तर वेळ नियंत्रक म्हणून आर.एस. पाटील यांनी काम पाहिले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष पी.झेड. कुवर यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एस. बच्छाव यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. सुत्रसंचालन ए.एस. पाटील यांनी केले. आभार व्ही.ए. सोनवणे यांनी मानले. मेळावा यशस्वीतेसाठी के.आर. अहिरराव, अविनाश सोनार, विजय सोनवणे, व्ही.पी. भदाणे, के.एस. गायकवाड, जी.एल.कांगणे यांनी सहकार्य केले.