शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 12:35 IST

धुळे तालुका पाणीटंचाई आढावा बैठक : सरपंच, ग्रामसेवकांनी मांडली पाण्याची समस्या, चारा छावणी सुरू करण्याची मागणी

धुळे : तालुक्यात पाण्याची स्थिती गंभीर झालेली आहे. ज्या गावांना पाण्याची टंचाई भासत आहे, तेथे पाण्याचे टॅँकर सुरू करावेत. त्याचबरोबर ज्या गावांना वाढीव टॅँकर पाहिजे आहेत, त्यांनीही प्रस्ताव सादर करून पाणी पुरवठा विभागाने ते मंजूर करावेत. पाणी टंचाई निवारणार्थ युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात  अशा सूचना धुळे ग्रामीण मतदार संघाचे आमदार कुणाल पाटील यांनी आज जिल्हा परिषद  प्रशासनाला दिले. दरम्यान चाºयाचीही स्थिती गंभीर होऊ लागली असून, चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करावेत अशी मागणीही त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर धुळे तालुक्याची टंचाई आढावा बैठक गुरूवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे,  पंचायत समितीचे उपसभापती दिनेश भदाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पढ्यार, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार किशोर कदम, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे ,   उपअभियंता एन.डी.पाटील,आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एस.बी. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी तालुक्यात २३ गावांना २० टॅँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून २६ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तालुक्यात तीन तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना मंजूर असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दोन विहिरींचे खोलीकरण पूर्ण झाले असून, चार विहिरींच्या खोलीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली असल्याचे सांगितले. यानंतर तालुक्यातील प्रत्येक गावाची पाणी टंचाईची माहिती सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडून घेण्यात आली. सरपंच, ग्रामसेवकांनी वाढीव टॅँकरची मागणी केली. तसेच विहिर खोलीकरण, नवीन पाईपलाईन टाकणे, हातपंप दुरूस्तीची मागणी केली. तालुक्यातील अजंग येथे तीन टॅँकरद्वारे सात फेºयास सुरू आहे. गावाला प्रति माणसी २० लिटरप्रमाणे पाणी दिले जात असून, अजंगला आता वाढीव टॅँकर मंजूर होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आला.तालुक्यातील भिरडई येथे भीषण पाणी टंचाई आहे. या गावासाठी तात्पुतरी पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र जिल्हाधिकाºयांनी त्यात त्रुटी काढल्या. त्या त्रुटी काढून नव्याने प्रस्ताव सादर केला, तरी जिल्हाधिकारी तो प्रस्ताव मंजूर करीत नसल्याचा आरोप या गावातील पदाधिकाºयांनी केला. दरम्यान या तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेसाठी साडपाच लाखांचा खर्च अपेक्षित असून हे काम झाल्यास पुढील पाच वर्षाचा पाण्याचा प्रश्न सुटू शकणार असल्याचे सांगण्यात आले. मोरदडतांडा येथील वादात असलेल्या पाण्याच्या स्त्रोताऐवजी नवीन पाण्याचे स्त्रोत शोधण्यासाठी नाशिक येथील भुजल तज्ज्ञांना तातडीने बोलविण्याची कार्यवाही करावी तसेच सध्या सुरू असलेल्या टॅँकरच्या फेºया वाढविण्याच्या सूचना दिल्या. सौंदाणे गावासाठीही टॅँकरची संख्या वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली. या गावासाठी राष्टÑीय पेयजल योजनेला मंजुरी मिळाली असल्याचे सांगण्यात आले.  तांडाकुंडाणे येथेही टॅँकरची संख्या वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील सोनगीर व फागणे ही दोन गावे अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करीत आहे. या गावातील पाणी टंचाईवरील उपाय योजनांसाठी स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना करण्यात आली. दरम्यान ज्या गावांना पाणी टंचाई भासत आहे त्यांनी तसेच ज्या गावांना वाढीव टॅँकर सुरू होणे गरजेचे आहे, तेथील प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. तसेच प्रशासनानेही त्यास मंजुरी द्यावी अशा सूचना अधिकाºयांना दिल्या. तलाठी, ग्रामसेवकांनी  जागृत रहावे- प्रांताधिकारीतालुक्यात असलेल्या टंचाई संदर्भात तलाठी, ग्रामसेवकांनी जागृत रहावे. गावात पाण्याची टंचाई भासत असल्यास त्यासंदर्भातील प्रस्ताव हातोहात घेऊन यावेत. त्याला तत्काळ मंजुरी दिली जाईल असे प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शांताराम राजपूत, कृउबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पंचायत समितीचे माजी सभापती बाजीराव पाटील, डॉ. दरबारसिंग गिरासे, भगवान पाटील, तालुका कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी उपस्थित होते. सुमारे दीड तास ही बैठक सुरू होती. बैठकीला तालुक्यातील ग्रामस्थही उपस्थित होते.

*चारा  छावणी सुरू करावी

पाण्याप्रमाणेच जिल्ह्यात चाºयाचीही गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ३१ मे अखेरपर्यंत गुरांना चारा पुरेल अशी स्थिती आहे. मात्र पावसाळा लांबल्यास चाºयाची स्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यात चारा छावणी अथवा चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली.  कोकण अथवा ठाणे परिसरातून चारा उपलब्ध होईल अशा पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचना यावेळी करण्यात आली. 

टॅग्स :Dhuleधुळे