धुळे : मनपा मालकीच्या भूखंड परस्पर विकल्याचे उघडीस आल्यानंतर आयुक्तांनी कागदपत्रांची पडताळणी करून हा भूखंड परपस्पर विक्री करून मनपाची फसवणूक करणाºयावर गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आले़महापालिकेच्या मालकीच्या मालेगावरोडवरील सर्व्हे नं.४८३/२ हा मोकळा भूखंड किशोर बाफना यांनी परस्पर विकल्याची तक्रार निनाद सुरेश पाटील महापालिकेत केली होती़ या गंभीर प्रकारविषयी पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांना १५ आॅगस्ट रोजी लेखी निवेदन देवून या भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी केली होती़ दरम्यान निवाद पाटील यांच्या तक्रारीवर मनपा आयुक्त अजिज शेख यांनी कागदपत्राची तपासणी केली होती़सदर जागेची अभिन्यास मंजूर असतांना खुली जागा म्हणून या भुखंडाची परपस्पर विक्री केल्याचे स्पष्ट झाल्याने आयुक्तांनी किशोर बाफना व इतरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार आयुक्तांचे प्रतिनिधी संजय बहाळकर व प्रकाश सोनवणे हे चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद देण्यास गेले होते त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नेऊन तेथे एक तास बसवुन ठेवले़ पुन्हा गुन्हा दाखल करण्यास नकार दिला़परपस्पर सरकारी जमिनी विकणाऱ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन पोलिस अधिकाºयांना देण्यात आले़ यावेळी सभापती सुनील बैसाणे, नगरसेवक संजय पाटील, मंगलाताई पाटील, किरण आहिरराव, हर्षकुमार रेलन, किरण कुलेवार, रावसाहेब नांदे्र अमोल मासुळे, राजेश पवार, लक्ष्मीबाई बागुल, बालीबेन मंडोरे, नरेंद्र चौधरी, भारती माळी आदी उपस्थित होते़
भुखंड विकणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:20 IST