लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी तैयबबेग समदबेग मिर्झा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. साक्री तालुका अध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी तैयबबगे मिर्झा यांना शहर अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र नुकतेच दिले.संदीप बेडसे, अॅड.नरेंद्र मराठे, प्रा.नरेंद्र तोरवणे यांच्या यावेळी उपस्थित होते. तैयब मिर्झा हे निजामपुर ग्रा.पं.चे माजी उपसरपंच ताहीरबेग मिर्झा यांचे मोठे बंधू आहेत.त्यांच्या निवडीबद्दल अनिल गोटे, प्रांतिक सदस्य सुरेश सोनवणे, जि.प. सदस्य पोपटराव सोनवणे, डॉ.नितीन सूर्यवंशी, महिला आघाडीच्या ज्योती पावरा, प्रकाश शिरसाठ, करीम शहा, कल्पेश बागुल, भाऊसाहेब टिळे, राजेश बागुल व पदाधिकारी व कार्यकत्यांसह आदींनी निवडी बद्दल स्वागत केले आहे.
राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी तैयबबेग मिर्झांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:53 IST