धुळे- येथील हिरे महाविद्यालयात मागील १४ दिवासांपासून उपचार घेत असलेल्या पाच रूग्णांचे पुन्हा स्वॕब घेणार असल्याची माहिती हिरे महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.दिपक शेजवळ यांनी दिली. या रूग्णांचे नमुने आधी पॉजीटीव्ह आले आहेत. मागील १४ दिवसांपासून हिरे रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच सोमवारी देखील १४ दिवस पुर्ण झालेल्या पाच रूग्णांचे स्वॕब घेतले जाणार आहेत.
१४' दिवस पुर्ण झालेल्या ५ रूग्णांचे स्वॕब आज घेतले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:06 IST