चार महिने होऊनही संशयित फरारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 09:41 PM2020-12-02T21:41:02+5:302020-12-02T21:41:29+5:30

शिरडाणे येथील घटना : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

The suspect is still absconding after four months | चार महिने होऊनही संशयित फरारच

चार महिने होऊनही संशयित फरारच

Next

धुळे : तालुक्यातील शिरडाणे येथील तरुणाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील चार संशयित हे चार महिन्यांपासून अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध घेवून त्यांना शासन करण्यात यावे अशी मागणी मयत तरुणाच्या वडीलांनी केली आहे.
धुळे तालुक्यातील शिरडाणे येथील निखील रतीलाल पाटील या २१ वर्षीय तरुणाने १४ आॅगस्ट रोजी पहाटे स्वत:च्या राहत्या घराच्या वरच्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात मयत निखीलचे वडील रतीलाल हिम्मत पाटील यांनी दिलेल्या फियार्दीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पण, निखील याने आत्महत्या केली नसून त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप रतीलाल पाटील यांनी केला आहे. १३ आॅगस्ट रोजी दुपारी निखील पाटील याला शेताजवळच मारहाण करण्यात आली होती. मुलाने आत्महत्या केली नसून त्याला प्रवृत्त केले आहे. याप्रकरणी आनंदा भारत पाटील, विनोद दिलीप पाटील, भगवान दगडू पाटील, पंकज बापू पाटील या चार जणांवर संशय आहे. घटनेपासून हे फरार आहेत. त्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा, त्यांना शासन करावे अशी मागणी मयत निखीलचे वडील रतीलाल हिम्मत पाटील यांनी केली आहे.

Web Title: The suspect is still absconding after four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे