शासनाच्या धोरणानुसार महापालिकेतर्फे शहरात एलईडी पथदिवे बसविले जाणार आहेत. मुंबई येथील एका कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. संबंधित कंपनीला पथदिवे बसविण्यासाठी सर्वेक्षण करून स्वतंत्र अहवाल तयार करावा लागणार आहे. त्यात शहरातील रस्ते, त्यांची रुंदी व कोणत्या रस्त्यावर किती पोल आहेत, नव्याने किती पोल उभारावे लागतील, रस्त्याच्या रुंदीप्रमाणे किती वॅटचे दिवे लावावे लागतील, यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यासाठी ठेकेदाराला दीड महिन्याची मुदत देण्यात आली आहे. पथदिवे बसविण्याच्या कामावर १० कोटी रुपये खर्च होतील. पथदिवे लावल्यानंतर त्यांच्या देखभाल - दुरुस्तीची जबाबदारी पाच वर्षे ठेकेदाराकडे असेल. शहरात १८ हजार एलईडी पथदिवे लावण्यात येतील, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
एलईडी पथदिवे बसविण्यासाठी सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:29 IST