शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

धुळे येथील तरुणाची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 6:57 PM

गळफास घेतला : राजहंस कॉलनीत शोककळा, धुळ्यात अंत्यसंस्कार

ठळक मुद्देअमोल हा सिंहगडच्या कॉलेजमध्ये शिकत असताना पुण्याच्या बिबवेवाडी भागातील सेक्टर नंबर ३ मध्ये तो रुम करुन राहत होता़ त्याच्या सोबत कोणी मित्र वगैरे नव्हता. त्याने आत्महत्या का केली, काय कारण असावे, असे विविध प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अमोलचे वडील हे तालुक्यातील कुसुंबा स्टेट बँकेच्या शाखेत अधिकारी आहेत़ आई देखील नोकरी करते़ त्याला दोन बहिणी असून एकीचे लग्न झालेले आहे़ तो एकलुता एक होता़त्याचा मृतदेह धुळ्यातील त्याच्या निवासस्थानी आणण्यात आला़ बुधवारी शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाºया धुळ्याच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना   सोमवारी पुण्यात घडली. या तरुणावर बुधवारी शोकाकूल वातावरणात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून त्याबाबतचा तर्कवितर्क लावले जात आहेत.  चितोड रोडवरील राजहंस कॉलनीत राहणारा अमोल रमेश श्रीराव (२२) हा तरुण पुण्याच्या सिंहगड परिसरामधील अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता़ रविवारी त्याचा वाढदिवस होता़  वाढदिवस असल्याने त्याचे आई-वडील आणि दोघी बहिणींनी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या़ फोनवर त्याच्या आवाजात फरक जाणवत असल्याचे अमोलच्या वडिलांना जाणवले़ त्याच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी सकाळी पुन्हा अमोलला फोन लावण्यात आला़ पण, त्याने फोन उचलला नाही़ वारंवार फोन करुनही उपयोग होत नसल्याने त्याबाबत काळजी वाढली़ त्यामुळे त्याच्या मित्रांशीही संपर्क साधण्यात आला होता़ पण, अमोलबद्दल काहीही माहिती मिळत नव्हती़ अमोल राहत असलेल्या घराच्या शेजाºयांनी फोन करुन अमोलच्या पालकांना या घटनेची माहिती दिली़ अमोलने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे कळताच येथील राजहंस कॉलनीत शोककळा पसरली़