-प्रणव भामरे, विद्यार्थी
काही महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण घेतले. मात्र नेटवर्क अडचणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने दुर्लक्ष हाेत होते. शाळेत आता नियमित जातो. शिक्षकांकडून विद्यार्थांची काळजी घेतली जाते.
-अलोक पाटील, विद्यार्थी
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्याचा आदेश शासनाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. या कालावधीत शाळा व क्लास दोन्ही एकाच वेळी बंद ठेवण्यात आल्याने सराव होऊ शकला नाही. शिक्षण विभागाने शिक्षकांना ऑनलाइन पध्दतीने शिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र मोबाइल व नेटचा खर्च परवडणारा नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागले हाेते. नियम व अटींवर शाळा सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण संस्थांना देण्यात आले आहे. मात्र काही शिक्षक व विद्यार्थीं यांच्याकडून मास्कचा वापर केला जात नाही. त्यामुळे नाहक इतर विद्यार्थांना अडचणीला सामाेरे जावे लागते.
-पंकज जाधव, विद्यार्थी