शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

घाणीच्या साम्राज्यात अडकले प्राथमिक आरोग्य केंद्र ‘कोरोना’च्या अनुषंगाने अस्वच्छतेचे उमटले प्रदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 12:01 PM

कापडणे येथील विदारकता । कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांची गैरसोय, कर्मचारी पोहचतात उशिरा

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन प्रयत्न सुरु असताना मात्र धुळे तालुक्यातील कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र त्याची कोणत्याही प्रकारची जाणीव नसल्याचे समोर आले आहे़ ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोग्य केंद्रात येणाºया रुग्णांची गैरसोय होत आहे़धुळे तालुक्यातील कापडणे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असून याअंतर्गत पाच उपकेंद्र येतात़ कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कापडणे गावासह धनुर, लोणकुटे, दापोरा, दापुरी, सरवड, कौठळ तामसवाडी, देवभाने, न्याहळोद, शिरडाणे, विश्वनाथ, सुकवड, वडगाव आदी समावेश होतो़ या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकाºयांची पदे मंजूर असून गेल्या कित्येक महिन्यापासून सध्या केवळ एकच महिला वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे़ अद्याप दुसºया वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती झालेली नाही़ त्यामुळे सध्या एकाच अधिकाºयावर कामाचा ताण येत आहे़ बहुतेक वेळा बहुतांश कर्मचारी कामावर नियमित हजर नसल्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचाºयांची चांगलीच दमछाक होते़ ओपीडी वार्डातील संपूर्ण रुग्णांना इंजेक्शन देणे व यानंतर औषध दालनात परत येऊन रुग्णांना औषध वाटप करणे अशी दोन विविध कामे एकाच वेळेला करावी लागतात़ दवाखान्यात खोकल्याचे औषध आहे़ मात्र, कोणत्याही रुग्णाला ते दिले जात नसल्याचे समोर आले आहे़कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण कक्षात दवाखान्याच्या खिडक्यांवर तंबाखूच्या व थुंकीच्या पिचकाºया मारलेले आहेत़ खिडक्यांच्या सर्वत्र जाळ्या तुटलेल्या आहेत़ खाटांवर बेडशीट नसल्यामुळे कित्येक दिवसापासून खाटा धुळीने माखलेले आहेत़ खाटांवर अनावश्यक खराब कपडे बहुतेक वेळेला फेकलेले असतात़ वैद्यकीय अधिकारी हे रुग्णांची तपासणी रुग्ण दालनात न करता दालनाबाहेरच करतात़ आरोग्य केंद्राच्या संरक्षक भिंतीला रंगरंगोटी न केल्याने भकास अवस्थेत जीर्ण भिंती दिसून येत आहेत़ भिंतींचे प्लास्टर निघाले आहे़ भिंतीलगत कचरा जाळल्याने जागोजागी भिंती काळपट पडल्या आहेत़रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या दालनाजवळ शासकीय सूचनांचे बॅनर लावलेले असून ते देखील उलटे लोंबकळत आहे़ दवाखान्याच्या परिसरात सुकलेल्या व कोरडी पडलेल्या अनेक वृक्षांचा सांगाडा उभा आहे़ इमारतीच्या भिंतींना भेदुन वृक्षांची वाढ झाल्याने बांधकाम खराब होत आहे़ इमारतीलगत काँक्रिटीकरण तोडून वृक्ष लागवडीसाठी खड्डे कित्येक वर्षापासून खोदून पडलेले आहेत़ मात्र, अद्याप एकही वृक्षलागवड केलेली नाही. येणाºया रुग्णांसाठी बसण्याचे फरशीचे ओटे तुटलेली आहेत़ कोणत्याही दालनाला नावे दिलेले नाहीत़ आॅपरेशन दालनासमोरची फरशी अस्वच्छ असून आंतररुग्ण विभागात घाणीचे साम्राज्य आहे़ आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे़

टॅग्स :Dhuleधुळे