आता नर्स नव्हे नर्सिंग ऑफिसर ...
कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर पदनामात बदल करण्याची मागणी संघटनेने केली होती. पदनामात बदल झाल्याने आता नर्स ऐवजी नर्सिंग ऑफिसर असे संबोधले जाणार आहे.
कोविड भत्ता मिळणार
सातव्या वेतन आयोगाचे थकीत असलेले हफ्ते मिळण्याची मागणी परिचारिका संघटनेने केली होती. मात्र कोरोनामुळे राज्य शासनाला आर्थिक चणचण भासत असल्याने थकीत हफ्ते न देता कोविड भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी अभूतपूर्व आंदोलन संघटनेने हाती घेतले होते. या आंदोलनात सर्व कर्मचारी एकजुटीने सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळेच शासनाला मागण्या मान्य कराव्या लागल्या. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य झाल्याने आनंद झाला आहे.
- पूनम पाटील, राज्य उपाध्यक्ष परिचारिका संघटना