शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात खासदार हिना गावितांच्या वाहनावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:45 IST

मराठा आरक्षणाचा मुद्दा : मनोज मोरेंसह ८ जण ताब्यात, तणावपूर्ण वातावरण

ठळक मुद्देधुळ्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाखासदार डॉ़ हिना गावितांच्या वाहनावर दगडफेकतणाव निर्माण झाल्याने पोलिसांची जादा कुमक मागविली

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला येणाºया नंदुरबारच्या खासदार डॉ़ हिना गावित यांच्या वाहनांवर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा क्रांती मोर्चा आंदोलनकर्त्यांकडून दगडफेकीचा प्रकार झाला़ ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली़ तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत  मनोज मोरेंसह ८ ते १० जणांना ताब्यात घेतले़ गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन सुरु आहे़ त्यातच रविवारी पालकमंत्री दादा भूसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती़ पालक मंत्री दादा भुसे यांनीही सुरुवातीला आल्यावर मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळीही कार्यकर्त्यांची मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी केली. नंतर पालक मंत्री हे बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. बैठक सुरु झाल्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यात सहभागी होण्यासाठी खासदार डॉ़ हिना गावित या आल्या. तेव्हा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खासदारांच्या गाडीवर चढत त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनावर अर्धनग्न होत चढून काहींनी चाल केली़  घोषणाबाजी करत  लाथ मारुन वाहनाच्या समोरील काच फोडली़ घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि त्यांच्यासह त्यांचे वाहन सुरक्षितस्थळी पोहचविले़ त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न करत घुसण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान, घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज मोरे यांच्यासह ८ ते १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ त्यांना मोहाडी पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे़ जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी आंदोलनस्थळी तातडीने यावे आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे़ या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा