केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री भारती पवार या जिल्हा दौऱ्यावर आल्या असताना त्यांना अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्रातर्फे (औषध निर्माण अधिकारी) यांना कोविड योद्धा घोषित करा, तसेच फार्मासिस्ट आरोग्य विभागाचा महत्त्वाचा कणा असून त्यांना राज्य आणि केंद्र सरकारकडून कौतुकाची थापही मिळालेली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्रामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर बीएचएमएस, बीएससी, नर्सिंग, जीएनएम प्रशिक्षण घेतलेल्यांना नियुक्ती देत आहेत, परंतु फार्मसीमध्ये शिक्षण घेतलेली डी.फार्म, बी.फॉर्म व एम.फार्म यांना कोणत्याही प्रकारे घेण्याचे नियोजन नसल्याने हा फार्मासिस्टवर एक प्रकारचा अन्याय होत आहे. फार्मासिस्टना कोविड व्हॅक्सिनपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री भारती पवार यांना निवेदन देताना सोबत आमदार अमरीशभाई पटेल, जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार काशीराम पावरा, डॉ. गिरीश महाजन, धुळे जि.प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे उपस्थित होते.
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिभूषण सिंह, वरिष्ठ उपाध्यक्ष अनुज पटेल, महाराष्ट्र प्रभारी प्रवीण शुक्ला यांच्या मार्गदर्शनातून प्रदेशाध्यक्ष दत्ता मारोती खराटे, प्रदेश सचिव रोहित वाघ, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. पंकज चौधरी, दीपक तिरमल, पीयूष जोशी, प्रशांत पाटोळे, दर्शन अग्रवाल, चंद्रकांत नगराळे, धुळे जिल्हा अध्यक्ष मनोहर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते़