निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड. चक्षुपाल बोरसे, माजी जिल्हाध्यक्ष गाैतम पारेराव, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष योगेश जगताप, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शहराध्यक्ष सुनील जेधे आदींच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात नदी किनारी गॅसचे अवैध पंप सुरू आहेत. झोपडपट्टीसह इतर भागांमध्ये गावठी दारूचे अड्डे सुरू आहेत. चाैपाटीसह शहराच्या चहुबाजुला सट्टापेढ्या सुरू आहेत. पाचकंदीलच्या मुख्य बाजारपेठ परिसरात भांग, गांजा विक्रीचे अड्डे आहेत. शहरासह जिल्ह्यात बनावट दारूचे कारखाने सुरू आहेत. प्रत्येक पान दुकान आणि किराणा दुकानांवर बंदी असलेला गुटखा सर्रासपणे विक्री होत आहे. हे सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. तसेच बनावट व्यक्तींवर गुन्हे दाखल करून मुख्य सूत्रधारांना मोकाट सोडण्याचा प्रकार बंद करावा, अशीही मागणी केली आहे.