भरती झालेेल्या वाहन व चालक उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:42 AM2021-03-01T04:42:16+5:302021-03-01T04:42:16+5:30

गेल्या फेब्रुवारी महिन्यात परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी सन २०१९ मधील चालक तथा वाहक यांची स्थगिती उठवण्यात ...

Start training of recruited vehicle and driver candidates | भरती झालेेल्या वाहन व चालक उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करा

भरती झालेेल्या वाहन व चालक उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करा

Next

गेल्या फेब्रुवारी महिन्यात परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी सन २०१९ मधील चालक तथा वाहक यांची स्थगिती उठवण्यात आल्याचे परिपत्रक काढले होते. त्याबाबतचा आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रक यांना देण्यात आला आहे. मात्र धुळे परिवहन महामंडळातील डी. पी. ओ व डी. टी. ओ. यांचा निष्काळजीपणामुळे धुळे येथील भरती झालेले १५० प्रशिक्षणार्थी उमेदवारांना उपासमारीची वेळ येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी १५० प्रशिक्षणार्थी उमेदवार हे मेडिकल आधारावर उत्तीर्ण झाले आहेत. प्रशिक्षणासाठी विलंब का होत आहे. याबाबत कोणतेही कारण दिले जात नाही. तसेच उडवाउडवीची उत्तर दिली जात असल्याचा आरोप उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी केला आहे. येत्या मंगळवारपर्यंत सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण देण्यात यावे. अन्यथा विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेने दिला आहे.

Web Title: Start training of recruited vehicle and driver candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.