शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

धुळ्यात दोन ठिकाणी बसवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 10:49 PM

तणावपुर्ण शांतता, संवेदनशिल भागात पोलिसांचा बंदोबस्त

ठळक मुद्देनगावबारीसह बाजार समिती परिसरात तणावबसेसचे नुकसान, प्रवाश्यांना बसस्थानकात सोडलेसंवेदनशिल भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात एकाचवेळी नगाव बारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी बसवर दगडफेकीची घटना घडली. दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या.  सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. दगडफेकीनंतर जमाव तेथून पसार झाला. घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली़ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांना आवश्यक त्या सूचनाही केल्या़ शहरातील पारोळा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ रस्त्यावर जळगावकडून येणाºया एम.एच.१४ बीटी३९११ क्रमांकाच्या जळगाव - धुळे बसवर रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास एका जमावाकडून अचानक दगडफेक झाली. दगडफेकीत बसच्या चालक कॅबीनची काच फुटली. दगड काच तोडून बसमध्ये आल्याने प्रवासी घाबरले. प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबविल्याने पुढील अपघात टळला. बस थांबते तो पर्यंत दगडफेक करणाºयांचा जमाव तेथून पळाला. घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या आझाद नगर पोलीस स्टेशनवरील फौजफाटा पोलीस निरीक्षक दत्ता पवारासह घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे परिसरात शांतता पसरली.दुसºया घटनेत   नगाव बारी परिसरात मुंबई - आग्रारोडवर रात्री साडे आठ ते नऊ वाजेदरम्यान एम.एच.२० बीएल ०९२३ क्रमांकाच्या धुळे - शिंदखेडा बसवर मागून मोटारसायकलवर अचानक पुढे आलेल्या तीन युवकांनी बसवर दगड फेकला. त्यामुळे बसची पुढची काच फुटली. दगड फेकल्यानंतर ते युवक तेथून भरधाव वेगाने पसार झाले. घटनेनंतर देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद निकम हे घटनास्थळी दाखल झाले. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दगडफेकीचे कारण समजले नाही. घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.