लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सरवडनजिक रस्ता ओलांडणाºया दुचाकीला एसटी बसची जोरदार धडक बसल्याने बाप-बेटा ठार झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़ एमएच १८ एएल ६१७९ क्रमांकाच्या दुचाकीने वसंत राजाराम भील (४०) आणि त्यांचा मुलगा श्याम वसंत भील (१२) हे दोघे कापडणे येथून सरवडला लग्नासाठी जात होते़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास दुचाकीने रस्ता ओलांडत असतानाच शिरपूरकडून धुळ्याकडे येणारी एमएच १४ बीटी २२१८ क्रमांकाच्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ या अपघातात बाप-बेट्याला जबर दुखापत झाली़ परिणामी त्यांचा मृत्यू ओढवला आहे़
महामार्गावर एसटी व दुचाकी अपघात, बाप-बेटा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:50 IST