धुळे : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरातील भंगार बाजार परिसरात आढळताच आरोग्य यंत्रणेने या भागात धाव घेतली़ त्या रुग्णाच्या घरासह परिसरात औषधांची फवारणीही केली़ दरम्यान, हा भाग यापुर्वीच कंटेनमेंट झोनमध्ये होता़ मात्र, यातील काही भाग नसल्याने त्या संपूर्ण परिसराला बांबू लावून सील करण्यात आले आहे़गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश आणि राज्य स्तरावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असलेतरी स्थानिक पातळीवर देखील ही बाब गांभिर्याने घेण्यात आलेली आहे़ यापुर्वी महानगरात ज्या ज्या ठिकाणी रूग्ण आढळून आलेले आहेत़ त्याठिकाणी महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रीत करुन आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत़शहरातील ८० फुटी रोडवरील तिरंगा चौक, वडजाई रोड, गजानन कॉलनी या भागात रुग्ण आढळल्यामुळे हा संपुर्ण परिसर महापालिकेने सील केलेला आहे़ साधारण दीड किमीचे अंतर सीलबंद केल्यामुळे त्यात भंगार बाजाराचा बहुतांश भाग येतो़ परिणामी हा भाग यापुर्वीच सील केलेला होता़ आता हा नवीन रुग्ण याच भागात सापडल्याने संपूर्ण परिसराला बांबू लावून सील ठोकण्यात आलेले आहे़याठिकाणी महापालिकेची आरोग्य यंत्रणा पोहचली़ या ठिकाणी असलेल्या प्रत्येक घराच्या ठिकाणी आवश्यक ती औषधांची फवारणी करण्याचे काम मार्गी लावण्याचे काम हाती घेण्यात आलेली आहे़ याशिवाय घरोघरी जावून कोणी रुग्ण आहे का, असल्यास त्याच्या आजाराचे कारण समजून घेत स्वॅब देखील घेतले जात आहे़एकंदरीत पाहता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक आणि जिल्हा स्तरावर आवश्यक ती उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे़वर्दळ झाली ठप्पभंगार बाजार भागात कोरोना रुग्ण आढळल्यामुळे विविध मार्ग बंद करण्यात आलेल्या आहेत़ परिणामी या ठिकाणची वर्दळ ठप्प झाली आहे़
पॉझिटिव्ह रुग्ण सापडताच भंगार बाजाराचा परिसराला ठोकले ‘सील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:39 IST