शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसाठी लवकरच २८० सदनिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:11 IST

आराखडा मंजूर : पोलीस हौसिंग महामंडळाकडून जागेचीही पाहणी

संडे हटके बातमीधुळे : पोलिसांना हक्काचे घर मिळावे, त्याची स्थिती उत्तम असावी यासाठी शहरातील साक्री रोडवरील कुमारनगर भागात नव्याने सदनिका बांधण्यात येणार आहे़ या कामांच्या आराखड्याला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे़ पोलिसांसाठीच्या २८० सदनिकांसाठी पाठपुरावा सुरु आहे़ शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी वसाहती निर्माण केल्या जात असतात़ तशाच वसाहती पोलिसांसाठी सुध्दा केल्या आहेत़ पण, पोलिसांच्या वसाहतींना आता तब्बल शंभर वर्षाहून अधिक काळ झालेला असल्याने पोलिसांच्या वसाहती जुन्या झालेल्या आहेत़ घरावर लावलेले कवलाचे छपरदेखील निकामी झाले असल्याने पाऊस आल्यानंतर घर गळते़ त्यामुळे बहुतेकांनी घराच्या छतावर प्लॅस्टिक पेपर अंथरला आहे़ घर दुरुस्तीसंदर्भात वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील झालेला आहे़ त्यानुसार घरांची डागडुजी सुरु असते़ त्यासाठी शासनाचा निधीदेखील खर्च केला जात असतो़ पोलिसांच्या वसाहती फारच जुन्या झाल्या असल्यामुळे नव्याने त्यांच्यासाठी सदनिका तयार करण्याचा विषय प्रशासनाच्या पटलावर होता़ दोन टप्प्यात काम मार्गी लावले जाणार असल्याने पहिल्या टप्प्यातील २८० घरे ही कुमारनगर भागातील पोलिसांच्या जुन्या वसाहतीच्या जागेवर होणार आहे़ज्या जागेवर सदनिका बांधल्या जाणार आहेत त्या जागेची पाहणी पोलीस हौसिंग महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून यापुर्वीच करण्यात आली आहे़ आवश्यक असणारा आराखडा तयार केल्यानंतर त्याला तत्त्वत: मंजुरी मिळालेली आहे़ दोन बेडरुम, हॉल आणि किचन याप्रमाणे घराची रचना असणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले़ ५६० घरकुलांना मिळाली मंजूरीपोलिसांसाठी नव्याने होणाºया ५६० घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झालेला आहे़ त्यातील पहिला टप्पा हा २८० घरांचा असणार आहे़ तर तितक्याच घरांचा प्रस्ताव दुसºया टप्प्यासाठी राहणार आहे़ पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्याच्या कामाला प्रारंभ होईल़

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस