कोविड-१९चे काम करताना प्राथमिक शिक्षकांना आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, सॅनिटायझर, हेडशिल्ड असे साहित्य दिलेले नाही. प्रत्यक्ष घरोघरी सर्वेक्षणाचे काम करताना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षकांना कोणतेही ५० लाखांपर्यंतचे विमा कवच किंवा सानुग्रह अनुदान नाही. कोरोनाची लागण झाल्यावर रुग्णालयात बेड आरक्षित नाही. त्यामुळे शिक्षकांना जीव गमवावा लागतो. काही मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांमध्ये १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेले शिक्षक आहेत, ज्यांना पेन्शन नाही किंवा कोणत्याही योजनेचा लाभ नाही. त्यामुळे यापुढे सर्वेक्षणाचे आदेश काढताना इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही आदेश द्यावेत, अन्यथा या कामावर धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती बहिष्कार टाकेल, असा इशारा देण्यात आला. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस बापू पारधी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
...तर सर्वेक्षणावर बहिष्कार टाकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST