पालथे झोपल्याने फुप्फुसाची क्षमता वाढते. त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते; पण हे करीत असताना रुग्ण हा पूर्ण शुद्धीत आणि पालथे झाेपल्यास त्याला त्रास होणार नाही, हे काळजीपूर्वक बघितले पाहिजे. यासंदर्भात आपल्यावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यांच्या सल्ल्याने दिवसातून हे दोन ते तीन वेळेस केले पाहिजे.
असा वाढवा रक्तातील ऑक्सिजन
१- पालथे झोपताना एकदा डाव्या कुशीवर १५ मिनिटे नंतर उजव्या कुशीवर १५ मिनिटे झाेपावे. तसेच १० मिनिटे पालथे झोपावावे, असे केल्याने फुप्फुसाची क्षमता वाढते. ते मजबूत होतात आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
२- रुग्णांनी हे करताना उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तसेच तो रुग्ण पूर्ण शुद्धीत आणि ते करण्यास सक्षम असावा, असे आपण दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकतो.
त्याचे फायदे काय
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांनी हे केल्यास त्यांची ऑक्सिजनची लेव्हल वाढते. तसेच त्यांच्या फुप्फुसांची क्षमता वाढते. रक्तातील ऑक्सिजन वाढल्याने पुढे उद्भवणारे धोके टळतात आणि रुग्ण लवकर बरा होता. त्याला ऑक्सिजन कमी होण्याची भीती राहत नाही.
- डॉ. विशाल पाटील (कोरोना जिल्हा नोडल अधिकारी)