धुळे : स्थायी समितीच्या सभेत अधिकारी सतत गैरहजर असतात तरीही त्याच्यांवर कारवाई होत नाही़ कारवाई करण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? सभेत कारवाई करण्याचा अधिकार आयुक्तांना असतो, त्यामुळे तुम्ही काय कारवाई करणार, साहेब... तुमच्या शब्दाला किमंत राहिलेला नाही, आता सभेत आयुक्तांना तरी बोलवा असे आवाहन संतप्त नगसेवक नागसेन बोरसे यांनी सभापतींना केले.महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शनिवारी स्थायी समितीची सभा घेण्यात आली़ यावेळी सभापती युवराज पाटील, सहाय्यक आयुक्त गणेश गिरी, प्ऱनगरसचिव मनोज वाघ आदीसह नगरसेवक उपस्थित होते़गैरहजर अधिकाऱ्यांचा मुद्दा चर्चेतमनपा आस्थापना विभागाचे प्रमुख नारायण सोनार सभेत सतत गैरहजर राहतात़ त्यामुळे गेल्या सभेत दांडी मारणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक बोरसे यांनी केली होती़ त्यानुसार अधिकाºयांना सभेत उपस्थित राहण्याबाबत सक्त ताकीद दिली होती़ तरी देखील शनिवारी महापालिकेचे सोनार यांनी २ दिवसांसाठी रजेचा अर्ज टाकून सभेत तिसºयांदा दांडी मारली. त्यामुळे गैरहजर राहणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला़ नगरसेवकांच्या तक्रारीवरून किती अधिकाºयांवर कारवाई झाली़, असा सवाल नगरसेवक बोरसे यांनी उपस्थित केला़ध्वज उभारणीसाठी ४९ लाखशहरातील महात्मा गांधी चौकात ध्वज उभारणीसाठी तब्बल ४९ लाख रूपये निधीला मान्यता देण्यात आली आहे़ हा विषय चर्चा न करताच मंजूर करण्यात आला़ या निधीतून महात्मा गांधी चौकात ४५ मिटर उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे़ त्यासाठी ४८ लाख ७४ हजार ४०० रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे़ हे काम २६ जानेवारी पर्यत पुर्ण होणार आहे़आठ सदस्य सेवानिवृतमनपा स्थायी समिती सदस्यापैकी आठ सदस्य जानेवारी महिन्यात निवृत्त होणार आहे़ त्याजागी नवीन सदस्य नियुक्ती प्रक्रिया राबविण्याची चर्चा झाली.
साहेब....सभेत तुमच्या शब्दाला किमंत राहीली नाही.. आता आयुक्तांना तरी बोलवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 22:53 IST