धान्याच्या साठ्यात मापात पाप; काही ठिकाणी निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:10 AM2021-02-28T05:10:44+5:302021-02-28T05:10:44+5:30

कोणाला किती मिळते धान्य? अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कार्ड गहू २० किलो, तांदूळ १५ तर साखर १ किलो दिली जाते़ ...

Sin in measuring grain stocks; Inferior in some places | धान्याच्या साठ्यात मापात पाप; काही ठिकाणी निकृष्ट

धान्याच्या साठ्यात मापात पाप; काही ठिकाणी निकृष्ट

googlenewsNext

कोणाला किती मिळते धान्य?

अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति कार्ड गहू २० किलो, तांदूळ १५ तर साखर १ किलो दिली जाते़ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति युनिट गहू ३ किलो व तांदूळ २ किलो दिले जातात. मात्र एपीएल कार्डधारकांना धान्य देय नाही. गरीब लाभार्थ्यांना रेशनचे धान्य वाटप केले जाते. मात्र त्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करणे गरजेचे सांगितले जात असल्याचे सांगण्यात आले.

मालकातर येथे धान्य मिळते खरे, पण घाणच

मालकातर येथे रेशन नियमित मिळत असले तरी बहुतांशी वेळा धान्य निकृष्ट दर्जाचे मिळते. तांदुळामध्ये अधिक घाण, हलका प्रतीचा व शिजविल्यानंतर पातळ होऊन जातो. तसेच तांदूळ व गव्हाच्या ५० किलो वनजाच्या गोणीत नेहमी ५ ते ६ किलो धान्य कमी भरते. त्या वेळी ग्राहकांमध्ये वाद होतात. आदिवासी संघटनादेखील लक्ष ठेवून असल्यामुळे आता पहिल्यापेक्षा चांगले धान्य व नियमित मिळते. आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारचे धान्य कसे मिळेल याकडे तालुका पुरवठा विभागाने लक्ष द्यावे.

Web Title: Sin in measuring grain stocks; Inferior in some places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.