शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धनेरच्या आठवडे बाजारात महिला लक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:53 IST

घटनेनंतर पहिल्यांदाच भरला बाजार : पी़ जे़ राठोड यांनी केली जनजागृती

ठळक मुद्देधनेरला भरला आठवडे बाजारअबालवृध्दांसह महिलांची लक्षणीय उपस्थितीसहायक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांच्याकडून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : साक्री तालुक्यातील रोहोड पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत येणाºया धनेर येथे राईनपाडाच्या घटनेनंतर शनिवारी पहिला आठवडे बाजार भरला होता़ यात पुरुष मंडळी कमी तर  महिलांची संख्या जास्त होती़ याठिकाणी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांनी अफवा पसरवू नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये, याबाबत जनजागृती केली़ साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळविणाºया टोळीच्या अफवेमुळे गेल्या रविवारी राईनपाडा येथे भिक्षुकीसाठी आलेल्या पाच जणांची संतप्त जमावाने ठेचून हत्या केली होती.  त्यानंतर रोहोड येथे तातडीने पोलीस दूरक्षेत्र स्थापन करण्यात आले. घटनेनंतर राईनपाडासह परिसरातील गावे ओस पडली आहे. बहुतांश गावात महिला आणि लहान मुले दिसत आहेत. घटनेला सात दिवस झाले आहे. घटनेनंतर राईनपाडा पासून अवघ्या आठ किलोमीटरवर असलेल्या  धनेर येथे शनिवारी आठवडे बाजार भरला.   या घटनेनंतर हा आठवडे बाजार पहिलाच असल्याने तो भरतो की नाही याची उत्सुकता होती़ पण, हा बाजार भरला़ बाजारात पाहिजे तशी गर्दी नव्हती. जी गर्दी होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय ठरली़ बाजारात पिंपळनेर पोलिसांकडून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन करीत याबाबत जनजागृती करण्यात आली. स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांनी स्वत: याठिकाणी उपस्थित राहून  अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.  तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले. 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस