शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात मुद्देमालासह चोरटा शिताफिने ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 12:45 IST

देवपूर पोलीस : ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त, बनवेगिरी उघड

ठळक मुद्देदेवपूर पोलिसांच्या बिट मार्शलची कामगिरीमुद्देमालासह चोरटा पोलिसांच्या ताब्यात४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमालही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपूर पोलिसांच्या शोध पथकाने संशयितरित्या दुचाकी घेवून उभ्या असणाºया रामचंद्र रमेश अलावे (२१, रा़ पटेल फल्या जि़ बडवानी, मध्यप्रदेश) याची विचारपूस केली़ यावेळी उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली़ चौकशीतून दुचाकीसह पाण्याची मोटार आणि वायर असा ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी दिली़ देवपूर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस कर्मचारी अनिल पाटील आणि राकेश नेतकर बुधवारी पेट्रोलिंग करत होते़ पांझरानदी चौपाटीजवळील जयहिंद जलतरण तलावाजवळ दुचाकी, पाण्याची मोटार आणि वायर घेवून एक संशयितरित्या उभा असल्याचे लक्षात आले़ त्याची चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाही़ त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले़ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज चव्हाण, कैलास पाटील, चंद्रकांत नागरे, कबीर शेख, संदिप अहिरे, प्रविण थोरात, विनोद अखडमल, नरेंद्र शिंदे यांनी त्याची चौकशी केली असता त्याने राहुल रमेश जाधव (३१, रा़ कौठळ ता़ धुळे) असे सांगितले़ परंतु त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे आधारकार्ड मिळून आले़ त्यात त्याचे नाव रामचंद्र रमेश अलावे (२१, रा़ पटेल फल्या ता़ राजपूर जि़ बडवानी, मध्यप्रदेश) असे आहे़ त्यामुळे त्याला अटक करण्यात आली़  चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेली एमएच १८ बीबी ०१०६ क्रमांकाची दुचाकी, सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीतील धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे राहणारे संजय जिरे यांच्या शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार, वायर असा ११ हजार २०० रुपयांच्या वस्तू असा एकूण ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल देवपूर पोलिसांनी जप्त केलेला आहे़ तसेच एमच १५ एएल २६३१ असा खोटा क्रमांक दुचाकीवर लावून हा भामटा बिनधास्त फिरत होता़ त्याची भामटेगिरी देवपूर पोलिसांनी उघड केली़

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा