शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

युरिया खताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 22:22 IST

शिंदखेडा तालुका : ऐन गरजेच्या वेळी टंचाई, शेतकऱ्यांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा/ मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण भटकावे लागत आहे. युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून कृषी विभागाने गांभीर्याने दखल घेऊन शेतकºयांची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.मालपूरसह परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीच्या उत्पन्नावरच येथील अर्थचक्र अवलंबून असल्यामुळे पिकांची देखभाल व योग्यवेळी खत व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी वणवण फिरत आहेत. मात्र, साधे खत देखील उपलब्ध होत नाही. यातच युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.गरज नसताना खते उपलब्ध असतात. मात्र, गरजेच्या वेळीच नेमका खतांचा तुटवडा निर्माण होतो. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. येथे गेल्या आठवड्यापासून युरिया, १५.१५.१५ तसेच १०.२६.२६ आदी खतांचा साठा संपल्याचे दुकानदार सांगत आहेत. यामुळे येथील शेतकरी खत घेण्यासाठी दोंडाईचा येथे जात आहेत. मात्र त्यांना तेथेही खत मिळत नाही. तर काही दुकानदार युरिया खताबरोबर अन्य अनावश्यक खते लिंक पध्दतीने विक्री करीत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तसेच याबाबत कृषी विभागाशी संपर्क करुनही समाधान होत नसल्याचे मालपूर परिसरातील शेतकºयांचे म्हणणे आहे.कृषी विभागाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका लिंकवर बियाणे व खतांची बुकिंग करण्याचे आवाहन केले होते. त्याला येथील शेतकºयांनी प्रतिसाद देत नोंदणी केली. मात्र, त्याचे काय झाले हे त्या शेतकºयांना देखील माहित नाही.मालपूर येथे युरिया, १५.१५.१५ तसेच १०.२६.२६ खतांचा साठा संपला असून रॅक लागल्यावरच खते मिळतील, असे येथील दुकानदार सांगत आहेत. मात्र तो साठा येथील क्षेत्रफळाच्या तुलनेत खुपच कमी असतो. दोन ते तीन टन खत मिळते. मात्र, ते पुरत नसल्यामुळे येथे नेहमीच खतांची टंचाई जाणवत असते. शेतकरी मागतील ते बियाणे व हवे तेवढे खत शेतकºयाना मिळाले पाहिजे, यासाठी पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा भावाने खताची विक्री करणे, हा दरवर्र्षीचा प्रकार आहे. मात्र त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने शेतकºयांना सर्रास नाडले जात आहे.येथील बागायती व कोरडवाहू कापसाला खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मात्र, पैसे घेऊन येथील शेतकरी दोंडाईचा, शहादा, नंदुरबार आदी ठिकाणी वणवण फिरत आहेत. मात्र, सद्यस्थितीत कुठेही खत सहज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. बांधावर खत योजनेचा पुरता फज्जा उडाला असून दुकानात नाही तर बांधावर कुठुन येईल, असे म्हणण्याची वेळ येथील शेतकºयांवर आली आहे. शेतकºयांना त्वरित युरिया व खताची उपलब्धता करुन द्यावी.