शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

प्रवाशांअभावी बस फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 22:28 IST

जिल्हांतर्गत बससेवेला प्रारंभ : बसस्थानकात शुकशुकाट, परतीच्या प्रवासात गाड्या आल्या रिकाम्या, नगण्य उत्पन्न मिळाले

दोंडाईचा/शिरपूर/साक्री : तब्बल दोन महिन्यानंतर एस.टी.ची सेवा पूर्ववत सुरू झाली. मात्र प्रवाशांना कुठलीही पूर्वसूचना न देता थेट बससेवा सुरू केल्याने, प्रवाशांकडूनही पहिल्या दिवशी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. काही ठिकाणी तर प्रवाशांअभावी फेºया रद्द कराव्या लागल्याची नामुष्की आली. त्यामुळे महामंडळाला अपेक्षित उत्पन्नही मिळू शकले नाही.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासांठी २२ मार्चपासून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला आहे. तेव्हापासून बससेवाही पूर्णपणे ठप्प झालेली आहे. मध्यंतरी राजस्थानातील कोटा येथील विद्यार्थी आणण्यासाठी धुळे आगाराच्या बससे पाठविण्यात आल्या होत्या. तर दोन आठवड्यांपासून परप्रांतीय मजुरांना सीमेपर्यंत सोडण्यासाठी बसेस सोडण्यात येत आहे. या व्यतिरिक्त दोन महिन्यात प्रवाशी वाहतूक बंदच होती.मात्र लॉकडाउनच्याा चौथ्या टप्यात शासनाने बरीच शिथिलता दिलेली आहे. तसेच या लॉकडाउनमध्ये रेडझोन व नॉनरेडझोन असे दोनच टप्पे तयार केलेले आहे.नॉनरेड झोन असलेल्या भागात एस.टी. महामंडळाने जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २२ मे पासून धुळे महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा व साक्री येथील आागरातून बससेवेला प्रारंभ झाला.जिल्हयातील चारही आगारांना बसफेऱ्यांचे नियोजन करून देण्यात आले होते. त्यात शिरपूर २४, शिंदखेडा ४०, दोंडाईचा २६ व साक्रीच्या २९ फेºयांचा समावेश होता. मात्र ज्या पद्धतीने नियोजन केले होते, त्यानुसार गाड्या सुटल्याच नाहीत. बसस्थानकात शुकशुकाट बघावयास मिळाला.दोंडाईचाकोरोना संचारबंदी व टाळेबंदीत दोंडाईचा सह सर्व आगाराचा बसेस बंद होत्या. शासनाच्या नवीन धोरणानुसार आज पासून दोंडाईचा आगारातून प्रवाशाचा सेवेसाठी पुन्हा बस फेºया सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु आज फक्त १२ प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशीच नसल्याने आगाराला अन्य फेºया रद्द कराव्या लागल्यात.सुमारे दोंडाईचा आगाराला आज फक्त ८२५ रूपयांचे रुपये उत्पन्न आले.या उत्पन्नातून डिझेलचा खर्चही निघू शकलेला नाही.शासनाचा बदलत्या नवीन धोरणानुसार आज दोंडाईचा आगारातून नेहमीप्रमाणे बसेस आगारात लावण्यात आल्यात. सकाळी ८ वाजता दोंडाईचा- साक्री व दोंडाईचा- शिरपूर जाण्यासाठी बस लावण्यात आली. बराच वेळ प्रवाशीची वाट पाहूनही प्रवाशी फिरकलेच नाहीत.साक्री जाण्यासाठी ७ व शिरपूर जाण्यासाठी ५ प्रवाशी बसलेत. अशा फक्त १२ प्रवाशांनी प्रवास केला .तिकडून परतीचा बस गाड्या खाली आल्यात. कोणीही प्रवाशी आलेच नाहीत.दुपारी दुपारी १२ वाजता शिंदखेडा व १ वाजता साक्री व 3 वाजता शिरपूर जाण्यासाठी बस लावण्यात आल्यात.परंतु एकही प्रवाशी फिरकलाच नाही .त्या मुळे साक्री,शिंदखेडा, शिरपूर या जाणाºया बस फेºया रद्द करण्यात आल्याची माहिती दोंडाईचा आगार प्रशासनाने दिली.दरम्यान कोरोनाची भीती व त्यातच अनेकांना माहीत नसल्याचा परिणाम मुळे प्रवाशी प्रवासाठी आले नसतील,असे बोलले जाते.बस स्थानकात शुकशुकाट व शांतता होती.शिरपूरयेथील आगाराच्या सात फेºयांचे नियोजन होते. सकाळी आठ वाजता पहिली गाडी दोंडाईचासाठी सोडण्यात आली. दर साडे आठ वाजता होळनांथेसाठी गाडी सोडण्यात आली. दोन्ही बसेसमध्ये मोजून २-३ प्रवाशी होते. प्रवाशीच नसल्याने उर्वरित पाच फेºया रद्द करण्यात आल्या अशी माहिती आगार प्रमुख वर्षा पावरा यांनी दिली. दरम्यान शिरपूर हे कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने घराबाहेर कोणीच पडले नाही. २३ पासून कंटेनमेंट झोन उठतोय. त्यानंतर परिस्थिती समजू शकेल. तसेच परप्रांतीय मजुरांना सोडण्यासाठी दोन बसेस हाडाखेड येथे पाठविल्याची माहिती देण्यात आली.निजामपूरसकाळी साक्री- निजामपूर बस सकाळी साडे दहा वाजता निजामपूर बस स्थानकात आली. येतांना एक प्रवासी व साक्रीकडे जातांना केवळ ३ प्रवासी होते. वाहक पाटील आणि चालक चित्ते सेवेस होते. प्रवाशी नसल्याने दुपारची फेरी रद्द केली.साक्रीआज साक्री आगारातून केवळ दोनच बस सोडण्यात आल्या. त्यांच्याकडेही प्रवाशांनी पाठ फिरवली या दोन बस मधून केवळ पंधरा ते वीस प्रवाशांनी प्रवास केल्याचे साक्री आगाराने म्हटले आहे.गेल्या दोन महिन्यापासून जनता घरातच बंदिस्त आहे त्यामुळे एसटी रस्त्यावर धावू लागल्यानंतर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळणे अपेक्षित असताना प्रवाशांनी मात्र याकडे पाठ फिरवली आह.साक्री आगारातून दोंडाईचा व निजामपुर आशा दोन बसेस सोडण्यात आल्या.आगारातून बस सुटल्यानंतर केवळ एक ते दोनच प्रवासी या बसमध्ये होते. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.बससेवेबाबत प्रवाशी अनभिज्ञबससेवा सुरू होण्याचा निर्णय गुरूवारी सायंकाळी उशीरा झाला. आणि थेट दुसºया दिवशी बससेवा सुरू झाली. त्यामुळे अनेक नागरिकांना बसेस रस्त्यावर दिसल्यानंतरच बससेवा सुरू झाल्याचे समजले. त्यामुळे सर्वच आगारांमध्ये सकाळच्यावेळी शुकशुकाटच बघावयास मिळाला.बससेवा सुरू होत असल्याचे कळविण्याची तसदीही विभाग नियंत्रक कार्यालयातील अधिकाºयांनी घेतली नाही. त्यामुळे बससेवेबाबत प्रवाशी अनभिज्ञ होते. नेहमीप्रमाणे मजुरांना सोडण्यासाठीच बसेस जात असाव्यात असाच समज अनेकांनी करून घेतला होता. त्यामुळे स्थानकात बसेस उभ्या असूनही तिकडे कोणी फिरकले नाही. त्यामुळे आगारांना अपेक्षित उत्पन्नही मिळाले नाही. यातून डिझेलचा खर्चही निघू शकला नाही. बससेवेबाबत दोन दिवसांपूर्वी निर्णय झाला असता, तर निश्चित पहिल्या दिवसापासून प्रतिसाद मिळाला असता.

टॅग्स :Dhuleधुळे