जिल्हा रुग्णालय येथील ८८ अहवालांपैकी एकही अहवाल पाॅझिटिव्ह आलेला नाही. तर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात आज दिवसभरात एकही बाधित आढळला नाही. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील ३१ अहवालांपैकी ४ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. त्यात संदीपनी कॉलनीत दोन, आदर्श नगरात १, दादुसिंग कॉलनीत १ तसेच रॅपिड टेस्टच्या १ अहवालापैकी एकही बाधित आढळला नाही.
साक्री भाडणे येथील सीसीसी मधील ३५ अहवालांपैकी एकही अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. तसेच रॅपिड टेस्टच्या २ पैकी एकही पाॅझिटिव्ह नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १० अहवालांपैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आहे. यात नंदुरबार येेथील दाेन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एसीपीएम लॅबमधील ६ अहवालापैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. साक्री तालुक्यातील फोफरे येथील एकाचा समावेश आहे. खासगी लॅबमधील ९ अहवालापैकी १ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. धुळे तालुक्यातील नेर येथील एकाचा बाधितांमध्ये समावेश आहे.