धुळे- जिल्ह्यातील आणखी सात रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी पाच रूग्ण शिरपूर येथील आहेत तर धुळे शहरातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. शिरपूर तालुक्यात आतापर्यंत ७७ कोरोना बाधित होते, त्यापैकी २३ मुक्त, ६ मृत्यू तर ४२ जण उपचार घेत आहेत. अंबिका नगरात तब्बल २८ रूग्ण आढळून आले होते़ त्यापैकी एकाचा मृत्यु तर १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़