धुळे : मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीसाठी स्वतंत्र बजेट करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात वृक्ष कर व वृक्षतोड परवानगीच्या अनामत रक्कमेतून जमा झालेल्या निधीचा समावेश करून बजेट तयार करावा असे निर्देश आयुक्त अजिज शेख यांनी दिले़महापालिकेच्या स्व़ दिलीप पायगुडे सभागृहात मंगळवारी वृक्ष प्राधिकरण समितीची सभा घेण्यात आली़ यावेळी हर्षकुमार रेलन, अमोल मासुळे, उमेर अन्सारी, आसिफ मोमीन, फातमा अन्सारी, नाजिया पठाण, अनिल थोरात, राहूल तारगे, मनोज शिरूडे, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, पल्लवी शिरसाठ, नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते़
वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र अदांजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:23 IST