अजंदे बुद्रुक येथील सरपंच सिंधूताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चारही विद्यालयाच्या संयुक्त सभेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला़ याप्रसंगी चारही विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाने शाळा बंद आहेत; मात्र शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे़ तरीही ऑफलाईन शाळा सुरू होणे आवश्यक आहे, त्यामुळे शाळा सुरू करण्यासंदर्भातील समितीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ठराव द्यावा अशी मागणी समितीच्या सभेत करण्यात आली़ सभेत शिक्षण विस्तार अधिकारी बी़ एस़ बुवा यांनी मार्गदर्शन केले़ तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ़ पाटील यांनी सभेला मार्गदर्शन केले़
आजपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला़ सभेला उपसरपंच चंद्रकांत पाटील, योगेंद्र राजपूत, मुख्याध्यापक एम़ जी़ पाटील, मुख्याध्यापक व्ही़ पी़ दीक्षित, मुख्याध्यापक जोसेफ, प्रभारी मुख्याध्यापक जगताप, ग्रामसेवक मराठे, तलाठी बोरसे व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक उपस्थित होते़ सूत्रसंचालन मासरे, प्रास्ताविक उपमुख्याध्यापक चौधरी तर आभार प्रदर्शन बी़ बी़ अग्रवाल यांनी केले़