शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे येथून चोरलेली गाडी सांगवी पोलिसांनी सिनेस्टाईल पकडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:16 IST

शिरपूर : पंजाब राज्यातील तिघे संशयित जेरबंद, ४ मोबाईल, ५३ हजार रोकड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : पुणे येथील पिंपरी-चिंचवड परिसरातून इनोव्हा गाडी चोरी झाल्याची घटना घडली होती़ दरम्यान, वायरलेसद्वारे सांगवी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून ही संशयित चोरटे न थांबता पसार झालेत़ मात्र पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून चोरून आणलेली गाडीस अखेर पकडली़ पंजाब राज्यातील तिघे  चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे़पुणे येथील ट्रक व्यावसायिक विशाल परमानंद ओझा रा़ जगन्नाथ कॉम्प्लेक्स, फ्लॅट नंबर १५ पुणे रोड चिंचवड स्टेशन येथे राहतात़ शनिवारी रात्रीच्या सुमारास घरासमोर उभी केलेली इनोव्हा गाडी क्रमांक एमएच १४ डीटी ७३५३ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली़ याबाबत १० रोजी  निगडी पोलिस ठाण्यात ६ लाख रूपये किंमतीची गाडी चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली़ गुन्हा दाखल होताच पिंपरी-चिंचवड येथून पोलीस कंट्रोल रूम धुळे येथे वायरलेसने माहिती देण्यात आली़ त्यावरून कंट्रोल धुळे येथून सांगवी पोलिस स्टेशनचे सपोनि किरणकुमार खेडकर यांना सदर गाडी बाबत माहिती देण्यात आली़ त्यामुळे त्यांनी लागलीच १० रोजी रात्री महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर नाकाबंदी केली़ सपोनि खेडकर यांच्यासह पोलिस हवालदार शामसिंग वळवी, संजीव जाधव, संदीप शिंदे अशांनी संशयित वाहनांची तपासणी केली़ त्याचवेळी एक संशयित वाहन शिरपूरकडून येतांना दिसले, त्यावरून त्या गाडीस थांबण्याचा इशारा केला असतांना देखील संबंधित चालकाने गाडी न थांबविता सुसाट वेगाने पळ काढला़ त्यामुळे पोलिसांना अधिकच संशय आल्यामुळे त्यांनी सिनेस्टाईल गाडीचा पाठलाग केला़ काही किमी अंतरावरील पनाखेड गावाजवळ चोरून आणलेल्या गाडीस ओव्हरटेक करून पोलिसांनी त्या गाडीस थांबविले़ गाडीचा चालकासह अन्य गाडीतील दोघांची चौकशी केली असता सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे त्यांनी दिलीत़ गाडीचे कागदपत्रे मागितली असता त्यांनी दिली नाहीत़ पोलिसांनी खाक्या दाखविताच गुन्ह्यांची कबुली चोरट्यांनी दिली़चोरून आणलेला वाहनाची नंबर प्लेट पाहता एम़एच़१४-डीटी-७३५३ असे दिसून आले़ चोरीस गेलेल्या वाहनाचा नंबर आणि थांबविलेला वाहनाचा नंबर एकच दिसून आल्याने गाडीसह तिघांना पोलिसांनी जेरबंद केले़ संशयितांना सांगवी पोलिस ठाण्यात आणल्यावर निगडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पुणे यांच्याशी संपर्क केला़ त्यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्याशी फोनवर संपर्क करून आपल्याकडील चोरीस गेलेली इनोव्हा कार व संशयित इसम सांगवी पोलीस स्टेशनला थांबवून ठेवले असल्याचे सांगण्यात आले़ त्यांची चौकशी करण्यात आली़ तिघांना सोपविले पुणे पोलिसांकडेसंशयितांनाकडून ४ मोबाईल व रोख ५३ हजार रूपये मिळून आले़ देवेंद्रसिंग जोता सिंग (२८, रा़ विखीविंड ता़पट्टी जि़ तरण -तारण, अमनदीप बबलू राम कुमार (३४, रा़ विखीविंड ता़ पट्टी जि़ तरण-तारण) व अमनवीर साहेबसिंग (२२, रा़ शेगपुरा ता़ पट्टी जि़ तरण-तारण) असे तिघांना जेरबंद करण्यात आले़ हे तिघे पंजाब राज्यातील आहेत़ गाडीसह तिघे चोरट्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांकडे अधिक तपासासाठी पाठविण्यात आले आहे़ 

 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी