धुळे : पांझरा नदीला आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणावर वाळू वाहून आलेली आहे़ त्याचा फायदा उचलत वाळू माफियांकडून गेल्या तीन महिन्यांपासून भरदिवसा बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरु असल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमधून समोर आले़यंदा साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात पावसाचे प्रमाण यंदा जास्त होते़ परिणामी अक्कलपाडा, अनेर, ुसुलवाडे अशी लहान मोठी धरणे ओसंडून वाहू लागली़ सर्व धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे पाणी पांझरा नदीत सोडण्यात आले होते़ यामुळे यंदा चार ते पाच वेळा पांझरा नदीला पुर आला होता़ त्यापैकी दोन पुर मोठे होते़ पुरामुळे कचऱ्यासह मोठ्या प्रमाणावर वाळू वाहून आली आहे़ आता पावसाने विश्राती घेतली आहे़ त्यामुळे पांझरेला आलेला महापूर देखील ओसरला आहे़ नदी कोरडी पडल्याने आता वाळू देखील दिसू लागली आहे़ परिणामी वाळू माफिया सरसावले आहेत़ रात्रीच्या वेळेस होणारी वाळूची चोरी आता भरदिवसा होऊ लागली असूनही प्रशासनाचे मात्र याकडे कानाडोळा आहे़ गेल्या तीन महिन्यापासून पांझरेच्या पात्रात सर्रासपणे ट्रॅक्टर उतरून वाळू उपसा केला जात आहे़ तर याच भागात काही ठिकाणी वाळू उचलण्यापुर्वी जाळी लावून ती स्वच्छ केली जात होती़ नदीत हा सर्व प्रकार सुरु असतांना देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे़ पांझरा नदीसह विविध ठिकाणी वाळूचा सर्रासपणे उपसा सुरु आहे़ याबाबत या भागातून वावरणाºया दोघा-तिघांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात अधिक बोलणे टाळत तेथून मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला़वाळू चोरटी वाळूचा उपसा करुन घरालगत मोकळ्या जागेत त्याचा साठा करुन ठेवला असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ भविष्यात वाळूची कमतरता जाणवेल तेव्हा हीच वाळूची साठेबाजी अधिक दराने वाळू माफियांनी लाभ मिळवून देवू शकते असे नागरिकांकडून सांगण्यात आले़
तीन महिन्यांपासून वाळू चोरीचे सत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:25 IST