शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:33 IST

पांझरेला आलेल्या महापुराचा फायदा : लाखो रुपयांच्या महसुलावर फिरतेय ‘पाणी’

धुळे : पांझरा नदीला आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणावर वाळू वाहून आलेली आहे़ त्याचा फायदा उचलत वाळू माफियांकडून त्याचा बेकायदेशीरपणे उपसा सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमधून प्रकर्षाने समोर आला़ नकाणे रोड आणि बिलाडी रोड परिसरात हा प्रकार बिनधास्तपणे सुरु आहे़ परिणामी लाखो रुपयांच्या ‘महसुलावर’ पाणी फिरत आहे़ पांझरेच्या पुलावरुन अनेक अधिकाºयांचा वावर आहे़ एरव्ही कारवाई करणारे अधिकारी आता गेले कुठे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे़ महापुरामुळे वाळू आली वाहूनगेल्या आठवड्यात साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात पावसाचे प्रमाण यंदा जास्त होते़ परिणामी लहान मोठी धरणे ओसंडून वाहू लागली़ ते सर्व पाणी पांझरा नदीमध्ये आल्याने अक्कलपाडा धरण देखील भरले़ हे सर्व पाणी पांझरेत आल्याने महापूर आला़ त्यात कचºयासह मोठ्या प्रमाणावर वाळू वाहून आली आहे़ आता पावसाने उसंत घेतली आहे़ त्यामुळे पांझरेला आलेला महापूर देखील ओसरला आहे़ नदी कोरडी पडल्याने आता वाळू देखील दिसू लागली आहे़ परिणामी वाळू माफिया सरसावले आहेत़ रात्रीच्या वेळेस होणारी वाळूची चोरी आता भरदिवसा होऊ लागली असूनही प्रशासनाचे मात्र याकडे कानाडोळा आहे़ हीच बाब ‘लोकमत’ने हेरली़ पांझरा नदीकाठावरील स्थितीगुरुवारी सकाळी ‘लोकमत’ चमूने शहरानजिक पांझरा नदी काठावरुन फेरफटका मारला़ त्यावेळेस पांझरेच्या पात्रात सर्रासपणे ट्रॅक्टर उतरविण्यात आले असल्याचे दिसून आले़ याच भागात काही ठिकाणी वाळू उचलण्यापुर्वी जाळी लावून ती स्वच्छ केली जात होती़ नदीत हा सर्व प्रकार सुरु असूनही कोणीही काहीही बोलायला तयार नसल्याचे समोर आले़ यावरुन त्यांची दहशत किती वाढली आहे, याचा प्रत्यय येतो़ पांझरा नदी काठावरुन नकाणे रोडलगत हा प्रकार कॅमेरात देखील टिपण्यात आला़ यानंतर ‘लोकमत’ चमूने आपली दिशा बिलाडी रोड भागाकडे वळविली़ याठिकाणी जावून पाहणी केली असता त्याच पध्दतीने वाळूचा सर्रासपणे उपसा सुरु असल्याचे प्रकर्षाने जाणवले़ या भागातून वावरणाºया दोघा-तिघांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात अधिक बोलणे टाळत तेथून मार्गस्थ होण्याचा निर्णय घेतला़ यावरुन वाळू माफियांची किती मोठ्या प्रमाणावर दहशत आहे, याचा प्रत्यय येतो़ वाळूचा छुपा साठाही शक्यनदीपात्रात असलेल्या वाळूचा उपसा करुन काही वाळू माफियांनी घरालगत मोकळ्या जागेत त्याचा साठा करुन ठेवला असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ भविष्यात वाळूची कमतरता जाणवेल तेव्हा हीच वाळूची साठेबाजी अधिक दराने वाळू माफियांनी लाभ मिळवून देवू शकते, असा बहुधा त्यांचा कयास असावा अशीही शक्यता नाकारता येत नाही़

टॅग्स :Dhuleधुळे