धुळे : जन्म, मृत्यू नोंदणी विभागातील दिरंगाईच्या विरोधात समाजवादी पार्टीने सोमवारी महानगरपालिकेसमोर निदर्शने केली़ यासंदर्भात धुळे महानगर समाजवादी पक्षातर्फे महासचिव इम्रान शेख, कल्पना गंगवार, जमील मन्सुरी, आसिफ इनायत, गुड्डु काकर, जाकीर खान, हाजी खुर्शिद, सादिक शाह, सईद अन्सारी, आसिफ अन्सारी, फातिमा आदींच्या शिष्टमंडळाने उपायुक्त गणेश गिरी यांना निवेदन दिले़
समाजवादी पक्षातर्फे मनपाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:18 IST