शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा सचिन जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:09 IST

विवाहाचा खर्च वाचवून आत्महत्याग्रस्त मुलांना मदत

ठळक मुद्देगरोदर महिलेला दिला मदतीचा हात - राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते दत्तक विद्यार्थ्यांना हमीपत्र वाटप आत्महत्याग्रस्त पालकांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीदर महिन्याने करिअर मार्गदर्शनहिवाळ्यात मायेची उब निर्माण होण्यासाठी मोफत स्वेटर वाटप

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कस्वत: च्या लग्नाचा वायफळ खर्च टाळून लग्न साध्या पध्दतीने करून त्या खचार्तून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ५० विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण करण्याचा अभिनव संकल्प करणारे ‘युवा नेतृत्व अ‍ॅड़ सचिन जाधव’ यांनी केला आहे़ प्रेरणादायी कार्याची सुरूवात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते दत्तक विद्यार्थ्यांना हमीपत्र वाटप करुन केले़सचिन जाधव यांनी स्थापन केलेल्या छत्रपती फाऊंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी गरीब, अनाथ आदिवासी मुलांसोबत दिवाळी साजरी केली जाते़ हिवाळ्यात मायेची उब निर्माण होण्यासाठी मोफत स्वेटर वाटप, मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा यासाठी मतदार नोंदणी, सरकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी घरोघरी जावून जनजागृती करणे, गणेशोत्सवात स्वच्छता मोहीम, फ्री मेडिकल कॅम्प, मोफत आधारकार्ड नोंदणी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतफेरी काढून निधी संकलन केले. लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्यसाधून जिल्हा व राष्ट्रीयस्तरावरील खेळाडूंचा सत्कार, सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान सोहळा, जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवतींना मोफत प्रशिक्षणाद्वारे आतापर्यत दोनशे युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे़छत्रपती फाऊंडेशन व दानशुर व्यक्तीच्या मदतीने गेल्या बारा वर्षापासून जिल्हयातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दप्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली आहे़ दरवर्षी १० अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाते़ विद्यार्थ्यांना लागणारा शैक्षणिक खर्च मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांना धनादेशद्वारे दिला जातो. विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची इच्छा असेपर्यत संस्थेकडून मदत केली जाते़ शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी दर महिन्याने करिअर मार्गदर्शन, पोलीस-सैनिक भरती मार्गदर्शन शिबीर राबविले जाते. महिला व विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून रोड-रोमिओवर पोलिस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी यामागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले.गरोदर महिलेला दिला मदतीचा हात -शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याजवळ २७ आॅक्टोबर २०१७ रोजी एक मनोरूग्ण महिला हताशपणे बसलेली होती़ काहीच्या लक्षात आले तर अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले होते़ याविषयाची माहिती अ‍ॅड़ सचिन जाधव व विक्की जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात दिली़ सदरील महिला सहा ते सात महिन्याची गरोदर होती़ तिच्या उपचारासाठी छत्रपती संस्थेकडून मदत करण्यात आली़प्रत्येक आई-वडीलांची इच्छा असते, की मुलांचे लग्न चालीरिती, रूढी पंरपरानुसार व्हावे, यासाठी लाखो रूपये खर्च केले जातात. मात्र आयुष्याचा आनंद एकीकडे ठेवून आत्महत्याग्रस्त पालकांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यासाठी साध्या पद्धतीने विवाह केले. विवाहासाठी होणारा खर्च वाचवून तो पैसा अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी करण्याचा संकल्प केला़ त्यासाठी माझ्या पत्नीनेही साथ दिली. आम्ही दोघांनी अमरावती येथे जावून शेतकºयांसाठी लढा देणारे राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन यासाठी त्यांचे आशिर्वाद घेतले़ यापुढे देखील गरीब अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी छत्रपती फाऊं डेशन खंबीरपणे पाठीशी उभी असेल़- अ‍ॅड़ सचिन जाधव