धुळे : शहरातील साक्री रोडवरील एकलव्य सोसायटी राहणाºया निवृत्त पोलिसाचे घर फोडून चोरट्याने सुमारे २ लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे़ दरम्यान, साक्री रोड परिसरात आत्तापर्यंत चोरट्यांनी ३ पोलिसांची घरे फोडले आहेत़ साक्री रोडच्या महिंदळे शिवारातील एकलव्य हौसिंग सोसायटीत प्लॉट नंबर ११ ब येथे अण्णा ओंकार चव्हाण (६२) हे निवृत्त पोलीस कर्मचारी राहतात़ १४ ते १७ नोव्हेंबर दरम्यान चव्हाण यांचे घर बंद होते़ बंद घराचा चोरट्यांनी फायदा घेतला़ दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान केले़ घरात शोधाशोध करुन १ लाख ४४ हजार किंमतीच्या ६ तोळे वजनाच्या सोन्याचे वेढे असलेल्या ६ अंगठ्या, ४८ हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, ५ हजार रुपये किंमतीचा चांदीची १०० ग्रॅम वजनाची गणपतीची मुर्ती, १ हजार ५०० रुपये किंमतीची १२ भार वजनाचे जोडवे, ५०० रुपये किंमतीचे २ भार वजनाचे चांदीचे लहान मुलांच्या पायातील बाळे असा एकूण १ लाख ९९ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरुन नेला़ घराच्या पत्र्याच्या कोठीमध्ये हे दागिने ठेवलेले होते़ घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलीस निरीक्षक आऱ एस़ काळे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़
निवृत्त पोलीस कर्मचाºयाचे घर चोरट्याने फोडले, ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:59 IST