शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
4
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
5
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
6
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
9
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
10
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
11
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
12
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
14
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
15
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
16
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
17
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
18
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
19
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
20
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:09 IST

भाजप विरूद्ध महाआघाडीत चुरस : अपक्षांची भूमिका महत्वाची ठरणार, काही गटांमध्ये दुहेरी-तिहेरी लढत

देवेंद्र पाठक।धुळे : शिंदखेडा तालुक्यात भाजप विरूद्ध महाआघाडी असाच सामना रंगणार आहे. जिल्ह्यात एकमेव शिंदखेडा तालुक्यातच गट व गणातील एकही जागा बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे १० गटात व २० गणांमध्ये चुरशीच्या लढती होण्याचे संकेत आहेत. यात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून, यात कोण बाजी मारते याकडे लक्ष लागलेले आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ‘लोकमत’ प्रतिनिधीने शिंदखेडा तालुक्याचा दौरा केल्यानंतर वरील चित्र दिसून आले.तालुक्यात भाजपने १० गटात आणि २० गणात उमेदवार उभे केले आहेत़ तर १० गटापैकी काँग्रेसने चार गटात, राष्ट्रवादी काँग्रेसने तीन गटात, शिवसेनेने तीन गटात असे महाआघाडीतर्फे उमेदवार देण्यात आलेले आहेत़ रासपने एका गटात तर अपक्ष चार असे एकूण २५ उमेदवार रिंगणात आहेत़ २० गणासाठी ६३ उमेदवार रिंगणात असून यात ४२ उमेदवार विविध पक्षाच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत़ यात २१ अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत.वर्शी गटात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या पत्नी हेमांगी सनेर आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी ठेकेदार डी़ आऱ पाटील यांच्या पत्नी ज्योती यांच्यात लढत आहे़ या गटातील पाटण गणात काँग्रेसचे माजी सरपंच विशाल पवार आणि भाजपत नुकतेच दाखल झालेले पंचायत समितीचे माजी सभापती प्रा़ सुरेश देसले यांच्यात लढत आहे़ खलाणे गटात काँग्रेसकडून शरद भामरे हे निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसकडून किशोर पाटील हे देखील इच्छूक होते़ पण, ऐनवेळी त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत बंडखोरी केली़ भाजपने युवराज कदम यांना उमेदवारी दिल्याने आता त्यांच्यात लढत होईल़ वालखेडा गणात जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील काँग्रेसकडून उमेदवारी करीत आहेत़ त्यांच्या विरोधात भाजपकडून प्रविण मोरे आणि अपक्ष अनिल पाटील हे उमेदवारी करीत आहेत़ अनिल पाटील हे बंडखोर किशोर पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात़ परिणामी प्रकाश पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे़ विखरण गटाकडे तालुक्याचे नाहीतर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ याठिकाणी कामराज निकम यांच्या पत्नी कुसुमबाई आणि त्यांच्या विरोधात विरदेल गटातील नेवाडे येथील माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या पत्नी इंदिराबाई या निवडणूक रिंगणात आहेत़ या दोघांमध्ये आता सरळ लढत होणार आहे़ मेथी गटातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली आहे़ त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कर्ले येथील नारायण चव्हाण यांना तर अपक्ष म्हणून सुराय येथील जितेंद्रसिंग राजपूत हे उमेदवारी करीत आहेत़ या मतदार संघात राजपूत मतदान संख्या बऱ्यापैकी असल्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकणार? यावरुन त्यांचा विजय मानला जात आहे़नरडाण्यात तिरंगी लढतनरडाणा गटात भाजपच्या संजिवनी सिसोदे आणि त्यांच्या विरोधात बंडखोरी करुन दामिनी चौधरी (अपक्ष) निवडणूक रिंगणात आहेत़ तर, शिवसेनेकडून ज्योती पाटील या उमेदवारी करीत असल्याने येथे तिरंगी लढत आहेत़ नरडाणे गणात राष्ट्रवादीकडून सत्यजित सिसोदे, भाजपकडून राजेश पाटील तर अपक्ष म्हणून सिमाबाई अनिल सिसोदे हे उभे असल्याने तिरंगी लढत रंगणार आहे़मालपूरमध्ये निवडणूक रंगणारया गटात पंचायत समितीचे सदस्य सतिष पाटील यांनी त्यांची पत्नी सुजाता हिला भाजपकडून उमेदवारी मिळवून दिली़ काँग्रेसकडून हेमराज पाटील यांच्या पत्नी चंद्रकला यांना उमेदवारी मिळाल्याने थेट दुरंगी लढत रंगणार आहे़ मालपूर गणात भाजपकडून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती पुष्पा रावल, काँग्रेसकडून प्रमिला पाटील आणि अपक्ष कल्पना इंदवे हे उमेदवारी करीत आहेत़चिमठाण्यात एकाच समाजाचे तिघेचिमठाणे गटात पोलीस विभागातील सेवानिवृत्त अधिकारी विरेंद्रसिंग गिरासे यांना भाजपकडून उमेदवारी दिली. तर भरत पारसिंग गिरासे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे़ रासपकडून जितेंद्रसिंग गिरासे हे निवडणूक रिंगणात आहेत. याच गटात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संगिता देसले यांचे पती राजेंद्र देसले यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती़ मात्र, ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने एकाच समाजाचे तीन उमेदवार समोर आलेले आहेत़विरदेलमध्ये आमने-सामने लढतविरदेल गटात भडणे येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय मंगळे यांच्या पत्नी सत्यभामा मंगळे यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली़ तर काँग्रेसकडून गिता वेताळे आहेत़ तर अपक्ष म्हणून मालूबाई मगरे उमेदवारी करीत आहेत़ काँग्रेस आणि भाजप यांच्यातच खरी चूरस रंगणार आहे़धमाण्यातही चुरस रंगणारशिवसेनेकडून शानाभाऊ सोनवणे यांची पत्नी सुनीता आणि भाजपकडून शोभाबाई ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत़ परिणामी दुरंगी लढत पाहावयास मिळणार आहे़होळ गणात माघार नाहीचनरडाणा गटातील होळ गणात एकाही उमेदवाराने उमेदवारी मागे घेतलेली नाही़ परिणामी तीन पक्ष आणि तीन अपक्ष असे सहा उमेदवार एकमेकांच्या विरोधात आपले नशीब आजमावीत आहे़ याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे़वर्शीकडे जिल्ह्याचे लक्षश्यामकांत सनेर यांचा गट विरदेल आहे़ मात्र, त्यांनी आपल्या पत्नीला वर्शी गटातून उभे केले आहे़ त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार ज्योती बोरसे या असल्यामुळे लढत आमने-सामने आहे़ यात कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे़नावांचा असाही सारखेपणाबेटावद गटात सपना ललित वारुडे आणि त्यांच्या विरोधात सपना नथ्थू वारुडे एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत़ दोघांचे कूळ, नाव आणि गाव एकच असल्याने या नावांची चर्चा गावात सुरु आहे़ नावांचा सारखेपणा असाही समोर आला आहे़दुरंगी -तिरंगी होणार लढतजिल्ह्यात धमाणे, वर्शी, बेटावद, विखरण आणि मालपूर गटात दुरंगी लढत होणार आहे़ तर, विरदेल, नरडाणा, मेथी, चिमठाणे आणि खलाणे या पाच गटात मात्र तिरंगी अशी लढत रंगणार आहे़ दिग्गज उमेदवार आता आमने-सामने उभे आहेत़खलाण्यात चुरसकृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पंडीत भामरे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली़ तर, किशोर पाटील यांना तिकीट नाकारल्याने शेवटी त्यांना अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची वेळ आल्याने चुरस आहे़

टॅग्स :Dhuleधुळे