धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या हद्दीत १७ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाउन (संचारबंदी) घोषीत करण्यात आली आहे़ संचारबंदीच्या या कालावधीत फिरस्ती करुन संचारबंदीचे उल्लंघन करुन फिरणाºया व्यक्ती, संघटनांच्या विरोधात नियमानुसार गुन्हे दाखल करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी संजय यादव यांनी दिले़कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेऊन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहितेअन्वये धुळे महापालिका क्षेत्रासाठी कोविड १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून १७ मे २०२० पर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत़ मात्र संचारबंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे नागरीकांकडून काही प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहे़ या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने आपल्या स्तरावर झोन / वार्ड तयार करुन या झोनसाठी राजपत्रित अधिकाऱ्यांची झोनल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी़ झोनल अधिकाºयांनी गुन्हे नोंदवावेत़तक्रार निवारण कक्ष कराझोनल अधिकाºयांनी फिरस्ती करुन संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व्यक्ती, संघटनांचे मोबाईलवरुन चित्रीकरण करुन त्यांच्या विरोधात नियमानुसार गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही करावी़ नागरीकांना तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात यावी़ मोबाईल नंबर देवून त्यावर येणाºया तक्रारीची दखल घेण्यात यावी असेही आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले़लक्ष ठेवण्याची आवश्यकतासंचारबंदी असूनही त्याचे उल्लंघन केले जात आहे़ त्यामुळे अशा लोकांवर पोलिसांनी लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे़ नियमांचे उल्लंघन करणाºयांना दंडनीय योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे आदेश पारीत झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली़
संचारबंदीचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे नोंदवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 21:41 IST